निपाणी : काँग्रेसने नेहमीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांना अपमानित करण्याचे काम केले. डॉ. आंबेडकर आणि संविधानाचा वापर काँग्रेसने (Congress) केवळ राजकीय पोळी भाजण्यासाठी केला आहे. केवळ एका कुटुंबाच्या आदेशावर चालणाऱ्या काँग्रेसने संविधानातील तत्त्वे पायदळी तुडविण्याचे काम केले. त्यामुळे जनविरोधी काँग्रेस सरकारला उपटून टाकण्याचा संकल्प करण्याचे आवाहन राज्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र (B. Y. Vijayendra) यांनी केले.