
नवी दिल्ली : मतचोरीच्या आरोपांवर प्रत्युत्तर देताना सत्ताधारी भाजपने सोनिया गांधींच्या नागरिकत्वाचा मुद्दा उपस्थित करून काँग्रेसला डिवचले. सोनिया गांधी १९८३ मध्ये भारतीय नागरिक झाल्या. मात्र तत्पूर्वीच १९८० मध्ये त्यांचे नाव मतदारयादीत आले होते, असा खळबळजनक दावा भाजपने केला.