
उमर अब्दुल्ला यांच्या फोटोवर नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्याने हे छायाचित्र अल्पावधीतच व्हायरल झाले. गेल्या वर्षी पाच ऑगस्टला कलम 370 रद्द झाल्यापासून उमर अब्दुल्ला, फारुख अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती हे तिघे माजी मुख्यमंत्री स्थानबद्ध आहेत.
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये इंटरनेट सुरू होताच सध्या स्थानबद्ध असलेले माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचे छायाचित्र प्रसिद्ध झाले, त्यात त्यांची दाढी वाढल्याचा दिसत होते. यावरून भाजपने त्यांना रेजर पाठविले असून, काँग्रेसची मदत घेण्याचाही सल्ला दिला आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
उमर अब्दुल्ला यांच्या फोटोवर नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्याने हे छायाचित्र अल्पावधीतच व्हायरल झाले. गेल्या वर्षी पाच ऑगस्टला कलम 370 रद्द झाल्यापासून उमर अब्दुल्ला, फारुख अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती हे तिघे माजी मुख्यमंत्री स्थानबद्ध आहेत. इंटरनेट सुरू होताच दाढी वाढलेल्या उमर अब्दुल्ला यांचे छायाचित्र ट्विटरवर प्रसिद्ध झाले. या छायाचित्रात ते चटकन ओळखू येत नाहीत, त्यामुळे अनेकांना धक्का बसला. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह द्रमुक प्रमुख एम. के. स्टॅलिन यांनी छायाचित्र पाहून धक्का बसल्याचे सांगत काश्मीरमधील परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली होती.
आता यावरून भाजप तमिळनाडूने ट्विट करत त्यांना रेजर पाठविल्याचा स्क्रिनशॉट ट्विट केला आहे. पण, त्यांनी हे ट्विट डिलीट केले. रेजर गिफ्ट केल्याचा स्क्रिनशॉट शेअर करताना त्यांनी म्हटले होते, की प्रिय उमर अब्दुल्ला, तुम्हाला असे पाहून खूप दुःख झाले. तुमचे अनेक भ्रष्ट दोस्त बाहेर मजा करत आहेत. कृपया तुम्ही हे गिफ्ट स्वीकारावे आणि अन्य कोणत्या मदतीची गरज असेल तर काँग्रेसशी संपर्क करा.