मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकार धोक्यात; भाजपची खेळी सुरू!

वृत्तसंस्था
सोमवार, 20 मे 2019

भाजपने राज्यपालांना पत्र लिहून मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. याबाबत त्यांनी राज्यपालांना पत्र लिहिले आहे. एक्झिट पोलमध्ये देशात पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार येईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

भोपाळ : मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकारकडे पुरेसे संख्याबळ नसल्याचे पत्र भाजपने राज्यपाल आनंदीबेन पटेल यांना दिले आहे. त्यामुळे आता एक्झिट पोलच्या अंदाजानंतर मध्य प्रदेशात सत्तेचा खेळ सुरु झाला आहे.

भाजपने राज्यपालांना पत्र लिहून मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. याबाबत त्यांनी राज्यपालांना पत्र लिहिले आहे. एक्झिट पोलमध्ये देशात पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार येईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

मध्य प्रदेश विधानसभेतील विरोधी पक्षनेते गोपाळ भार्गव यांनी राज्यपालांना बहुमत सिद्ध करण्याबाबत पत्र लिहिले आहे. यासाठी विधानसभेचे विशेष सत्र बोलविण्यात यावे, अशी मागणी केली आहे. याबरोबरच या सत्रात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरही चर्चा व्हावी, अशी मागणी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर 22 दिवसांतच कमलनाथ हे मुख्यमंत्रीपदी नसतील, असे भाजप नेते विजयवर्गीय यांनी म्हटले आहे.

मध्य प्रदेशात विधानसभेच्या 230 जागा असून, यापैकी 114 जागांवर काँग्रेसने विजय मिळविला होता. तर, भाजपला 109 जागा मिळाल्या होत्या. समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि अपक्ष आमदाराने काँग्रेसला पाठिंबा दिल्याने काँग्रेस सत्तेत बसले होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Wants Kamal Nath Govt To Prove Majority Writes Letter To Governor