राजकोट: गुजरातच्या राजकोटमधील एका शैक्षणिक संस्थेच्या वसतिगृहात विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली 40 दिवसांपासून फरार असलेला भाजप कार्यकर्ता विजय रादडिया अखेर पोलिसांसमोर हजर झाला आणि त्याला अटक करण्यात आली. आरोपी विजय रादडिया हा राजकोटमधील एका शैक्षणिक संस्थेचा ट्रस्टी आहे, आणि पीडित विद्यार्थिनी या संस्थेत शिक्षण घेत होती.