झेंडावंदन करण्यावरून वाद; भाजप कार्यकर्त्याची हत्या

टीम ई सकाळ
Sunday, 16 August 2020

७४व्या स्वातंत्र्यदिनानिमीत्त (Independence Day) झेंडावंदन करण्यावरून पश्चिम बंगालमध्ये (West bengal) वाद झाला. यामध्ये  ४० वर्षीय भाजप (BJP) कार्यकर्त्याची हत्या झाली आहे. ही घटना काल (ता. १५)ला घडली आहे. 

कोलकाता : ७४व्या स्वातंत्र्यदिनानिमीत्त (Independence Day) झेंडावंदन करण्यावरून पश्चिम बंगालमध्ये (West bengal) वाद झाला. यामध्ये  ४० वर्षीय भाजप (BJP) कार्यकर्त्याची हत्या झाली आहे. ही घटना काल (ता. १५)ला घडली आहे. 

ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मिळालेल्या माहितीनुसार, नातिबपुरमध्ये तृणमूल काँग्रेस (TMC) आणि  भाजपचे कार्यकर्ते आपल्या पक्ष कार्यालयाबाहेर स्वातंत्र्यदिनानिमीत्त तिरंगा फडकविण्यासाठी जमा झाले होते. परंतु, थोड्या वेळातच दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद सुरु झाला. या वादाचे रुपांतर मोठ्या तंट्यात झाले आणि भाजपच्या सुदर्शन नावाच्या ४० वर्षीय कार्यकर्त्याची यामध्ये हत्या करण्यात आली. तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या वादात ही हत्या केली असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.  

आरामबागमधील भाजपचे प्रभारी बिमान घोष यांनी म्हटले आहे की, 'सुदर्शन हे बूथ लेवलवरील पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते होते. शनिवारी ते झेंडावंदनाची तयारी करत होते. परंतु, तृणमूल काँग्रेसच्या गुंडानी त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांची हत्या केली'. मला कळत नाही की, तृणमूल काँग्रेसच्या गुंडाराजमधून पश्चिम बंगालला सोडविण्यासाठी आणखी किती भाजप कार्यकर्त्यांना जीव गमवावा लागणार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

तृणमूल काँग्रेसकडून भाजपच्या या सर्व आरोपांचे खंडन करण्यात आले आहे. हुगली जिल्ह्याचे तृणमूल काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष दिलीप यादव यांनी म्हटले आहे की, भाजपच्या दोन गटामध्ये अंतर्गत वाद झाला असून त्यामध्ये ही हत्या झाली आहे. यामध्ये तृममूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा कुठेही संबंध आलेला नाही. त्यांनी पुढे म्हटले आहे की, तृणमूल काँग्रेसशी या घटनेचा काही संबंध नसून पोलिस पुढील तपास करत आहे, त्यामुळे सत्य लवकरच बाहेर येईल. भाजप हिंसा करुन राज्यात अराजकता पसरविण्याचा प्रयत्न करत आहे. माझी लोकांना विनंती आहे की, राज्यातील लोकांना अशा राजकारणाचा विरोध करायला हवा.

दरम्यान, या घटनेच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी खासदार सौमित्र खान आणि ज्योतिर्मय महतो यांच्या नेतृत्वाखाली कोलकातामध्ये राज्य परिवहन महामार्गावर आंदोलन केले असून मृत कार्यकर्त्याच्या मृतदेहासोबत रास्ता रोको केला.  पोलिसांनी हा जमाव हटविण्यासाठी लाठी-चार्जही केला. तसेच, याप्रकरणी जिल्हा ग्रामीण पोलिस हुगलीचे पोलिस अधिक्षक तथागत बसु यांनी ११ जणांना अटक केले असल्याची माहिती दिली आहे. बसु यांनी यावेळी म्हटले आहे की, आम्ही या प्रकरणात काही करु शकणार नाही कारण; या प्रकरणी आणखी कोणीही तक्रार दाखल केलेली नसून गुन्ह्याची नोंद झालेली नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP worker killed in clash over hoisting national flag