esakal | भाजपच्या युवा महिला नेत्याला अंमलीपदार्थ बाळगल्याप्रकरणी अटक
sakal

बोलून बातमी शोधा

BJP youth leader Pamela Goswami arrested with cocaine in Bengal

या महिलेला तिच्या कारमधील कोकेनसह पोलिसांनी रंगेहाथ पकडलं आहे. 

भाजपच्या युवा महिला नेत्याला अंमलीपदार्थ बाळगल्याप्रकरणी अटक

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

भारतीय जनता पार्टीच्या युवा महिला नेत्याला कोकेन हा अंमलीपदार्थ बाळगल्याप्रकरणी पश्चिम बंगालमध्ये अटक करण्यात आली आहे. या महिलेला तिच्या कारमधील कोकेणसह पोलिसांनी रंगेहाथ पकडलं आहे. 


पामेला गोस्वामी असं या भाजपाच्या महिला नेत्याचं नाव आहे. शुक्रवारी ती आपल्या कारमधून कोकेन घेऊ जात असल्याची खबर पोलिसांनी मिळाली होती. यावेळी तिच्यासोबत तिचा मित्र प्रोबीर कुमार डे हा देखील होता. त्यामुळे पोलिसांनी या दोघांवर अटकेची कारवाई केली आहे. कोलकात्यातील न्यू अलिपूर भागातील एनआर अव्हेन्यू येथून त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यावेळी पोमेलाच्या कारमध्ये सुरक्षा रक्षकही होता. 


कोकेणचा पुरवठा करण्यासाठी पामेला गोस्वामी एका विशिष्ट ठिकाणी जाणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलीस तिच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. त्यानुसार पोलिसांनी तिचा पाठलाग करत तिची कार थांबवली. कार थांबवल्यानंतर पोलिसांनी तिची बॅग तपासली यावेळी पोलिसांना तिच्या बॅगमध्ये आणि सीटवर कोकेन सापडलं.