माझ्या 'त्या' 15 मिनिटांमुळेच बाबांचा घात झाला- पूनम महाजन

वृत्तसंस्था
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

मी बाबांना(प्रमोद महाजन) 15 मिनिटांनी उशिरा घरी यायला सांगितले आणि नेमकं याच वेळेत त्यांच्यावर गोळीबार झाला. मी बाबांना उशिरा यायला सांगितले नसते तर त्यांचा घात झाला नसता. थांबायला सांगितलं नसते तर ते माझ्या घरी आले असते आणि पुढे ती घटनाच घडली नसती. त्या 15 मिनिटांसाठी मी आजही स्वत:ला दोषी मानते अशा शब्दात भाजपाच्या युवामोर्चाच्या अध्यक्ष आणि खासदार पूनम महाजन यांनी भावना व्यक्त केल्या.

मुंबई- मी बाबांना(प्रमोद महाजन) 15 मिनिटांनी उशिरा घरी यायला सांगितले आणि नेमकं याच वेळेत त्यांच्यावर गोळीबार झाला. मी बाबांना उशिरा यायला सांगितले नसते तर त्यांचा घात झाला नसता. थांबायला सांगितलं नसते तर ते माझ्या घरी आले असते आणि पुढे ती घटनाच घडली नसती. त्या 15 मिनिटांसाठी मी आजही स्वत:ला दोषी मानते अशा शब्दात भाजपाच्या युवामोर्चाच्या अध्यक्ष आणि खासदार पूनम महाजन यांनी भावना व्यक्त केल्या.

पूनम महाजन आणि पंकजा मुंडे या नुकत्याच कलर्स मराठीवरील अस्सल पाहुणे इरसाल नमुने या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमात वडिलांच्या आठवणी सांगताना पूनम महाजन भावूक झाल्या. बाबा त्या दिवशी माझ्या घरी येणार होते. मीच त्यांना 10 ते 15 मिनिटांनी या असे सांगितले. त्या दिवशी मी उशिरा उठले होते आणि घरात साफसफाईसाठी कोणीही नव्हते. त्यामुळे वडिलांना 15 मिनिटांनी यायला सांगितले असल्याचे त्यांनी सांगितले.

ही घटना घडल्यानंतर बाबांना रुग्णालयात घेऊन जात असताना बाबा मला म्हणाले की मी असा काय गुन्हा केला, की मलाच हे पाहावं लागले, मी कोणालाही सुखी ठेवू शकलो नाही' असे बाबा सांगत होते, हे सांग असताना पूनम महाजन यांचाही कंठ दाटून आला होता. 22 एप्रिल रोजी 2006 रोजी प्रमोद महाजन यांच्यावर वरळीतील ‘पूर्णा’ इमारतीतील घरात त्यांचा भाऊ प्रवीणने तीन गोळ्या झाडल्या होत्या. त्या दिवसाच्या आठवणी पूनम महाजन यांनी सांगितल्या.
 
यावेळी राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंनी देखील प्रमोद महाजन यांची एक आठवण सांगितली. पंकजा मुंडे यांच्या लग्नात प्रमोद महाजन यांनीच पंकजा यांना उखाणा सांगितला होता. माझ्या लग्नात मंचावर खूप गर्दी झाली होती. प्रमोदमामा माझ्या मागे उभा होता. त्याने माझ्या हातात माईक दिला आणि उखाणा घ्यायला सांगितले. पण मला उखाणा येत नाही, असे मी त्याला सांगितले. प्रमोदमामाने लगेच मला एक उखाणा तयार करुन दिला, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले.

Web Title: Bjp Youth Leader Poonam Mahajan Blames Herself For Father Pramod Mahajan