‘हर काम देश के नाम’ : भाजपची नवी विकास नीती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

दिल्लीतील पराभवानंतर भाजपने आता ध्रुवीकरणाच्या अजेंड्याचा त्याग करण्याची तयारी चालविली आहे. केंद्र सरकारने विविध मंत्रालयांच्या माध्यमातून नेमकी कोणती लोककल्याणकारी कामे केली, हे लोकांपर्यंत पोचविणारी प्रचार मोहीम आखा, अशा सूचना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी अन्य नेते आणि दिल्लीतील मंत्र्यांना केल्या आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जावडेकर यांनी मंगळवारी रात्रीच तसे पत्र या मंत्र्यांना पाठविल्याचे समजते. केंद्र सरकारची विकासकामे लोकांपर्यंत पोचावीत म्हणून दूरचित्रवाणी, वर्तमानपत्रे आणि डिजिटल माध्यमांतूनदेखील जाहिरातबाजी केली जावी, असे जावडेकर यांनी त्यांच्या पत्रात म्हटले आहे. यासाठी १५ फेब्रुवारी ते ३१ मार्च हा काळ निश्‍चित करण्यात आला आहे. साधारणपणे दीड महिना राबविल्या जाणाऱ्या या मोहिमेची टॅगलाइन ‘हर काम देश के नाम’ अशी निश्‍चित करण्यात आली आहे. सर्व मंत्र्यांनी त्यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांना यासंदर्भात तातडीने सूचना द्यावात, असेही या पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे.

तिवारींची राजीनाम्याची तयारी
दिल्लीतील पराभवानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शविली होती. पण, पक्षानेच तो स्वीकारण्यास नकार दिल्याचे बोलले जाते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The BJPs new development policy in the name of every work