
उज्ज्वलकुमार
पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजप आता मुख्यमंत्री नीतिशकुमार यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे. लोकजनशक्ती पक्षाचे प्रमुख चिराग पासवान यांचा राज्याच्या राजकारणात उतरण्याचा आणि विधानसभा निवडणूक लढविण्याचा जाहीर केलेला निर्णय सहज जाहीर झालेला नाही. या निर्णयामागे भाजपचेच अदृश्य हात असल्याचे बोलले जाते. पासवान यांच्या व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेला आणखी वर आणण्यासाठी आवश्यक पटकथेचे भाजप तर लेखन करीत नाही ना, असा विचार करण्यास निश्चितच वाव आहे.