
हैदराबाद - सोशल माध्यमांवर दररोज लाखो तरुण मंडळी फोटो अपलोड करतात. मात्र, या फोटोचा गैरवापर होण्याचीही शक्यता असते. असाच एक धक्कादायक प्रकार हैदराबादमध्ये घडला आहे. सोशल मीडियाचा गैरवापर करून एका तरुणाने तब्बल 300 महिलांना फसवले आहे. याप्रकरणी हैदराबादच्या सायबर विभागाने 25 वर्षीय तरुणासा बेड्या ठोकल्या आहेत.
विनोद नावाच्या या तरुणाने सोशल मीडियाचा गैरवापर करत 300 महिलांची फसवणूक केली आणि त्यांचे फोटो पॉर्न साईटवर अपलोड करून त्यांना ब्लॅकमेल केले आणि त्यांच्याकडून पैसे उकळले. विनोद सोशल मीडियावरील तरूणींचे फोटो डाऊनलोड करून पॉर्न वेबसाईटवर त्यांच्या नंबरसह अपलोड करायचा. यानंतर विनोद त्याच नंबरवर फोन करून तुमचा फोटो पॉर्न वेबसाईटवर पाहिला असून मी सॉफ्टवेअर इंजीनिअर असल्याचे सांगायचा. नंतर मुलींना तो फोटो पॉर्न वेबसाइटवरून काढण्याबाबत सांगून पॉर्न वेबसाईटवरून फोटो हटवण्य़ासाठी तो मुलींकडे पैशांची मागणी करत असे.
एका पीडितने सलग चार महिने 10-10हजार रुपये त्याला दिले. त्यानंतरही तो पैशांची मागणी करत राहिल्याने तिला संशय आला. तिने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपीने तिचे फोटो डेटिंग ऍप आणि पॉर्न वेबसाईटवर टाकले. पीडितेने याची तक्रार सायबर सेलकडे केल्यानंतर पोलिसांनी आरोपी विनोद कुमारला अटक केली. आरोपी नवीन सीम कार्ड खरेदी करून विविध डेटिंग ऍपवरून मुलींचे फोटो आणि मोबाईल नंबर मिळवायचा. तसेच त्यांना फोन करून ती खरोखरच मुलगी आहे का याची खात्री करून त्यानंतर त्यांचे फोटो पॉर्न साईटवर अपलोड करून ब्लॅकमेल करायचा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.