मुलीसोबतचा मॉर्फ फोटो, शिष्यच महंत नरेंद्र गिरींना ब्लॅकमेल करत होता? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mahant Narendra Giri

मुलीसोबत मॉर्फ फोटो, शिष्यच महंत नरेंद्र गिरींना ब्लॅकमेल करत होता?

लखनऊ: अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी (Narendra Giri death) यांचा मृत्यू हा कट-कारस्थानाचा भाग आहे, असा आरोप हरिद्वारमधील (Haridwar) साधुंनी केला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये (suicide note) महंत नरेंद्र गिरी यांनी ब्लॅकमेलिंगमुळे (Blackmail) आयुष्य संपवण्याच्या निर्णयाप्रत पोहोचल्याचे म्हटले आहे. एका मुलीसोबतच्या मॉर्फ फोटोवरुन शिष्य आनंद गिरी ब्लॅकमेल करत होता, असे त्यांनी चिठ्ठीत लिहिले आहे.

या चिठ्ठीत भागमबरी मठाचे पुजारी आध्य तिवारी आणि त्यांचा मुलगा संदीप यांचे सुद्धा नाव आहे. तिघांनाही अटक करण्यात आली आहे. महंत नरेंद्र गिरी यांच्या संशयास्पद मृत्यूमुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. एफआयआर दाखल करण्यात आला असून त्यात आनंद गिरीवर आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

हेही वाचा: मुख्यमंत्री कार्यालयाचा अपरिपक्वपणा दिसला - देवेंद्र फडणवीस

या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी १८ सदस्यांची एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी महंत नरेंद्र गिरी यांना श्रद्धांजली वाहिली. आरोपींना सोडणार नाही, असे योगींनी म्हटले आहे, तर अखिलेश यादव यांनी उच्च न्यायालयाच्या न्यायमुर्तीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा: पाकिस्तानच्या तालिबान प्रेमामुळे सार्कची महत्त्वाची बैठक रद्द

व्हिडिओ सुद्धा बनवला होता

महंत नरेंद्र गिरी यांचे शिष्य निर्भय द्विवेदी यांनी अशी माहिती दिली की, महंत गिरी यांनी सुसाइड नोटशिवाय एक व्हिडिओसुद्धा केला होता. त्यांच्या फोनवर त्यांनी व्हिडिओ शूट केला होता. व्हिडिओमध्ये महंत नरेंद्र गिरी यांनी बऱ्याच गोष्टी सविस्तर सांगितल्या आहेत ज्याचा सुसाइड नोटमध्ये थोडक्यात उल्लेख आहे. हा व्हिडिओ पोलिसांकडे असल्याचं म्हटलं जात आहे.

महंत नरेंद्र गिरी यांचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत होता. पोलिसांनी खोलीची तपासणी केली तेव्हा तिथं एक सुसाइड नोटसुद्धा आढळली. ही सुसाइड नोट ७ पानांची होती.

loading image
go to top