Bharat Jodo Yatra : ‘भारत जोडो’ अडविण्याचा प्रयत्न; रणदीप सुरजेवाला

सुरजेवाला यांची टीका; सोनिया गांधींचा सहभाग; विजयादशमीच्या विश्रांतीनंतर पुन्हा सुरु; काँग्रेस कार्यकर्त्यांत जोश
block bharat jodo yatra Randeep Surjewala rahul gandhi sonia gandhi congress
block bharat jodo yatra Randeep Surjewala rahul gandhi sonia gandhi congressesakal

बंगळूर : कर्नाटकातील नेत्यांना सक्तवसुली संचलनालयाने समन्स पाठवून भाजप आणि राज्य सरकार काँग्रेसची बहुचर्चित ‘भारत जोडा पदयात्रा’ आडवू पाहात आहेत. पदयात्रेत अडथळे आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत, अशी टीका काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी केली. विजयादशमीच्या विश्रांतीनंतर पुन्हा प्रारंभ झालेल्या राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेत गुरूवारी काँग्रेस कार्यकर्त्यांत जोश भरला. सोनिया गांधी यांनी भाग घेतल्याने राहुल यांच्यात उत्साह दिसून आला. ‘भारत जोडो यात्रा’ सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच सोनिया गांधी यांनी गुरूवारी भाग घेतला. मंड्या जिल्ह्यातील पांडवपूर तालुक्यातील बेल्लाळे गावातून पदयात्रेची गुरूवारी सुरूवात झाली. माणिक्यनहळ्ळी गेटजवळ सकाळी ८.३० वाजता सोनिया गांधी या यात्रेत सहभागी झाल्या. राहुल गांधी, काँग्रेस नेते व हजारो काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत १५ मिनिटे त्याही चालतच राहिल्या.

या पदयात्रेत जिल्ह्यातील, बाहेरील जिल्हे आणि राज्यातील ३० हजारांहून अधिक लोक सहभागी झाले आहेत. अनेक गावातील महिलांनी सोनिया गांधींची आरती करून त्यांचे स्वागत केले. यावेळी महिलांसोबत फोटो काढले. सोनिया गांधींनी मुलांना चॉकलेट दिले. सोनिया गांधी अमृती गावापर्यंत चालत आल्या. तेथे पुत्र राहुल गांधी यांनी सोनिया यांनी मोटारीमध्ये बसण्याची विनंती केल्यानंतर त्या पुढे गेल्या. त्यानंतर जक्कनहळ्ळी गेटजवळ उतरून एका कॅफेमध्ये राहुल यांच्यासोबत कॉफी घेतली. १० मिनिटांच्या विश्रांतीनंतर सोनिया गांधींनी पुन्हा ५ मिनिटे भाग घेतला. पडलेल्या मुलीला सावरले पदयात्रेच्या स्वागतासाठी रस्त्याच्या कडेला उभी असलेली मुलगी चेंगराचेंगरीत खाली पडली. सोनिया गांधी त्या मुलीच्या जवळ गेल्या. राहुल गांधींनी त्या मुलीला उचलून घेतले. सोनिया गांधींनी मुलीच्या पाठीला घासून तिला चॉकलेट देऊन तिला धीर दिला. सोनिया गांधी जक्कनहळ्ळीजवळ चालत असताना त्यांच्या डाव्या पायाच्या बुटाची लेस निघाली.

एक कार्यकर्ता ती लेस बांधण्यासाठी पुढे गेला. मात्र यावेळी राहुल गांधींनी त्याला त्यापासून रोखले व स्वतः बुटाच्या लेस बांधल्या. पदयात्रा नागमंगला तालुक्यात आल्यानंतर सोनिया गांधी निघून गेल्या. या पदयात्रेला अनेक दिव्यांगांनीही पाठिंबा दिला. पदयात्रेत काॅंग्रेसचे कर्नाटक प्रभारी रणदीप सिंग सुरजेवाला, के. सी. वेणुगोपाल, जयराम रमेश, डी. के. शिवकुमार, विधानसभेतील विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या, स्वराज इंडिया पक्षाचे नेते योगेंद्र उपस्थित होते. राहुल गांधी नागमंगला तालुक्यातील मडीकेहोसूरजवळील विस्डम स्कूलमध्ये राहिले. शुक्रवारी नागमंगला, बेल्लूर क्रॉसमार्गे ही पदयात्रा आदिचुंचनगिरी येथे पोहोचणार असून राहुल गांधी तेथेच मुक्काम करणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com