
हृदयरोगाच्या रुग्णांना कोरोनाचा सर्वाधिक धोका असतो, हे सर्वांना माहीत आहेच. पण कोरोना साथीच्या सुरुवातीला बीपीच्या काही विशिष्ठ औषधांमुळे कोरोना रुग्णांना धोका असल्याची शक्यता व्यक्त होत होती.
नवी दिल्ली - कोरोना रुग्णांवर विशेषतः उच्च रक्तदाबाचा (बीपी) त्रास असलेल्या ‘बीपी’ची औषधे गुणकारी ठरत असून कोरोनामुळे मृत्यू होण्याचा धोका कमी आहे, असे निरीक्षण ब्रिटनमधील ईस्ट अँन्जिला (संयुक्त अरब अमिरात- यूएई) विद्यापीठाच्या अभ्यासात नोंदविले.
‘करंट अथरोस्केरॉसिस रिपोर्टस’ या नियतकालिकात या संबंधीची शोध निबंध प्रसिद्ध झाला आहे. या अभ्यासासाठी उच्च दाब अथवा उच्च रक्तदाब प्रतिबंधक औषध घेणाऱ्या २८ हजार रुग्णांची पाहणी करण्यात आली. ज्यांना ‘उच्च रक्तदाबाचा त्रास आहे आणि जे त्यासाठी ‘अँजिओटेन्सिन- कन्व्हरटिंग एन्झामी इन्हीबेटर्स (एसीईआय) किंवा ‘अँजिओटेन्सिन रिसेप्टर ब्लॉकर्स’ (एआरबी) या औषधांचे सेवन करतात त्यांना कोरोनामुळे गंभीर आजारी पडण्याचा धोका कमी झाल्याचे दिसून आले.
देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
‘‘हृदयरोगाच्या रुग्णांना कोरोनाचा सर्वाधिक धोका असतो, हे सर्वांना माहीत आहेच. पण कोरोना साथीच्या सुरुवातीला बीपीच्या काही विशिष्ठ औषधांमुळे कोरोना रुग्णांना धोका असल्याची शक्यता व्यक्त होत होती’’ असे यूएईच्या नॉर्विच मेडिकल स्कूलचे मुख्य संशोधक व्हॅसिलिओस व्हॅसिलियू म्हणाले. यासाठी नॉरफोक आणि नॉर्विच विद्यापीठ रुग्णालयातील संशोधकांनी बीपीच्या औषधांचा कोरोना रुग्णांवर काय परिणाम होतो याचा अभ्यास केला.
जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
असा केला अभ्यास
- उच्च दाब प्रतिबंधक औषध घेणाऱ्यांचे व ज्यांना रुग्णालयात अति दक्षता विभागात ठेवले आहे किंवा जीव रक्षक प्रणालीवर ठेवले आहे किंवा जे मरणाच्या दारात आहेत, अशा रुग्णांचे निरीक्षण.
- कोरोना व ‘एसीईआय’ आणि ‘एआरबी’ औषधोपचारासंबंधी १९ शोधनिबंधांचे विश्लेषण.
- विश्लेषणात ३८ हजारपेक्षा जास्त रुग्णांचा समावेश असून आतापर्यंतचा हा सर्वांत विस्तृत व सखोल अभ्यास आहे, असा संशोधकांचा दावा.
- जे रुग्ण ‘एसीईआय’ आणि ‘एआरबी’ घेत आहेत व जे घेत नाहीत, जे रुग्ण गंभीर आहेत किंवा मरणासन्न आहेत अशा रुग्णांची तुलना.
अभ्यासातील निरीक्षणे
- एकूण रुग्णांमध्ये उच्च रक्तदाबाचा त्रास असलेला प्रत्येक तिसरा कोरोनारुग्ण आणि ‘एसीईआय’ किंवा ‘एआरबी’ औषध घेणारे एक चतुर्थांश रुग्ण आढळले.
- हृदयरोग, उच्चदाबाचे रुग्ण आणि मधुमेहींना संसर्गाचा धोका जास्त असल्याचे दिसले.
- ‘बीपी’ची औषधे घेणाऱ्यांमध्ये कोरोनामुळे मृत्यूची किंवा प्रकृती खालावण्याची शक्यता जास्त असल्याचा
कोणताही पुरावा आढळला नाही, हे महत्त्वाचे मानले जाते.
- उच्चदाब असलेल्या कोरोना रुग्णांवर ‘बीपी’ची औषधे परिणामकारक असल्याचे आढळले.