
तिरुअनंतपुरम (पीटीआय) : केरळमध्ये गरिबांसाठी सुरू केलेल्या सामाजिक सुरक्षा निधी योजनेअंतर्गत बीएमडब्लू मोटारींच्या व आलिशान घरांच्या मालकांनीही अर्ज केल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्याच्या अर्थ विभागाने लाभार्थींच्या यादीची छाननी केल्यावर ही बाब उघड झाली.