वाराणसी : गंगा नदीच्या प्रभू घाटावर बोट उलटली; चार जण बुडाले, दोन जणांना वाचवले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Boat capsized on Prabhu Ghat on the river Ganga

गंगा नदीच्या प्रभू घाटावर बोट उलटली; चार जण बुडाले

उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये सोमवारी (ता. २३) मोठी दुर्घटना घडली. प्रभू घाटात एक बोट उलटली. या बोटीत सहा जण बुडाल्याची (Four drowned) माहिती आहे. खलाशांनी दोन जणांचा जीव वाचवला. (Boat capsized on Prabhu Ghat on the river Ganga)

काही लोक बोटावर स्वार होऊन बोटिंग करीत होते. दरम्यान, बोटीमध्ये पाणी भरल्याने बोट उलटली. बोट उलटल्यानंतर खलाशांनी नदीत उडी मारून दोन जणांचे प्राण वाचवले. तर चार जणांचा शोध सुरू आहे. स्थानिक पोलिस आणि गोताखोर बुडालेल्या (Four drowned) लोकांचा शोध घेत आहेत.

घटनास्थळी उपस्थित लोकांनी लोकांना बुडताना पाहिल्यानंतर पाण्यात उडी मारली. प्रभू घाटासमोर गंगेच्या मध्यभागी हा अपघात झाला. टुंडलाहून वाराणसीला (Varanasi) आलेले सहा जण जहाजातून निघाले होते. अचानक बोटीला छिद्र पडले आणि पाणी भरू लागले. लोकांना काही समजण्यापूर्वीच बोट नियंत्रणाबाहेर जाऊन गंगेत उलटली.

Web Title: Boat Capsized On Prabhu Ghat On The River Ganga Four Drowned Varanasi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :varanasiboat
go to top