VIDEO: रॅलीदरम्यान भाजप नेत्यांची बोट पलटली; सोशल मीडियावर उडवली जातेय टर

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 13 December 2020

कमीतकमी चार भाजप नेते आणि काही पत्रकार दल सरोवराच्या गोठवणाऱ्या पाण्यात पडल्याची माहिती आहे

श्रीनगर- कमीतकमी चार भाजप नेते आणि काही पत्रकार दल सरोवराच्या गोठवणाऱ्या पाण्यात पडल्याची माहिती आहे. भाजप जम्मू-काश्मीरच्या प्रसिद्ध दल सरोवराच्या ठिकाणी कॅम्पेन चालवत होते. यावेळी पत्रकार बोटमधून हे कॅम्पेन कव्हर करत होते. पाण्यात पडलेल्या सर्वांना सुखरुपणे बाहेर काढण्यात आले आहे. दल सरोवर पर्यटकांसाठी आकर्षण केंद्र असते. 

भाजप नेते शाहनवाज हुसैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही भाजप नेते आणि पत्रकार बोटमधून रॅली कव्हर करत असताना अचानक त्यांची बोट पलटली. त्यामुळे नेते आणि काही पत्रकार पाण्यात पडले. सर्वांना सुरक्षीतपणे बाहेर काढण्यात आलं आहे. बोटवर अनेक पत्रकार होते. सुदैवाने सर्वजण सुखरुप आहेत. दल सरोवरावर चांगली रॅली झाली. किनाऱ्यावर पोहोचल्यानंतर बोट पलटली.

श्रीनगरमध्ये प्रामुख्याने शिकारा नावाची बोट वाहतुकीसाठी वापरली जाते. जम्मू-काश्मीरमधील हे सांस्कतिक प्रतिक आहे. जम्मू-काश्मीरमध्ये सहाव्या टप्प्यातील जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुका पार पडत आहेत. यावेळी ही घटना घडली. केंद्र शासित प्रदेश झाल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच ही निवडणूक होत आहे. 7.48 लाखांपेक्षा अधिक मतदार 245 उमेदवारांचे भविष्य ठरवणार आहेत. आठ टप्प्यात ही निवडणूक होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Boat carrying journalists during BJP rally capsizes in Dal Lake