छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांसोबत चकमकीत 17 जवान हुतात्मा

वृत्तसंस्था
रविवार, 22 मार्च 2020

जखमी जवानांना रायपूरमधील रामकृष्ण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनीही या चकमकीबाबत माहिती घेतली. घटनास्थळापासून जवळच्या परिसरात नक्षलवाद्यांचा शोध घेण्यात येत आहे.

सुकमा : छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात शनिवारी रात्री नक्षलवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये झालेल्या चकमकीत 17 जवान हुतात्मा झाल्याचे आज (रविवार) समोर आले आहे. चकमकीनंतर बेपत्ता असलेल्या जवानांचे मृतदेह आज आढळून आले. 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुकमा जिल्ह्यातील कोराजगुडा डोंगराजवळील जंगलात ही चकमक झाली. या चकमकीत 14 जवान जखमी झाले होते. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक होती. पण, 13 जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत होते. अखेर आज सकाळी शोधमोहिमेदरम्यान या जवानांचे मृतदेह आढळून आले. चकमकीत पाच ते सहा नक्षलवादीही मारले गेले आहेत. या चकमकीमध्ये बरेच नक्षलवादी जखमी झाल्याची माहिती आहे. 

जखमी जवानांना रायपूरमधील रामकृष्ण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनीही या चकमकीबाबत माहिती घेतली. घटनास्थळापासून जवळच्या परिसरात नक्षलवाद्यांचा शोध घेण्यात येत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bodies of 17 Jawans Found 24 Hours During Encounter With Naxals in Sukma