
केरळमधील सीपीआय मुख्यालयावर बॉम्ब हल्ला
गुरुवारी रात्री उशिरा केरळची राजधानी तिरुअनंतपुरममध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य मुख्यालयावर बॉम्ब हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री 11.30 च्या सुमारास हा बॉम्ब हल्ला झाला. बॉम्बस्फोटानंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली. प्राथमिक माहितीनुसार या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.(bomb attack at cpi m headquarters in kerala)
हेही वाचा: मायावतींनंतर JDS चे कुमारस्वामी देणार भाजपच्या द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा!
मिळालेल्या माहितीनुसार, सीसीटीव्ही फुटेजमध्ये, गुरुवारी रात्री एक व्यक्ती सीपीआय पक्षाच्या मुख्यालयासमोर आपली दुचाकी मागे वळवताना दिसत आहे, तो माणूस हातात बॉम्ब घेऊन पक्षाच्या मुख्यालयाच्या इमारतीवर बॉम्ब फेकतो आणि पळून जातो.
एकेजी केंद्रावर हल्ला करून कोणीतरी यूडीएफला भडकावण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या हे प्रकरण हायप्रोफाईल असल्याने घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला आहे. अशी माहिती सीपीआय(एम) चे राज्य सचिव कोडियेरी बालकृष्णन यांनी दिली.
हेही वाचा: Assam Flood : आसाममध्ये पुरामुळे आणखी आठ मृत्यू, 31 लाख लोक प्रभावित
या बॉम्ब हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. सीपीआय कार्यालयात रात्री उशिरा झालेल्या बॉम्बस्फोटाबाबत पोलीस आयुक्त जी स्पर्जन कुमार म्हणाले की, पोलिसांनी त्याचा तपास सुरू केला आहे. त्याचबरोबर सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी बॉम्बने हल्ला करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवण्याबरोबरच वाहनाची तपासणी सुरू केली आहे.
Web Title: Bomb Attack At Cpi M Headquarters In Kerala
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..