esakal | बाँबस्फोटाच्या कटातील आरोपींना ११ वर्षांनंतर सुनावली शिक्षा
sakal

बोलून बातमी शोधा

Court

पाकिस्तानमधून आरडीएक्स व अन्य स्फोटके आणून पंजाबमध्ये स्फोटाचा कट रचण्याऱ्या दहा आरोपींना ११ वर्षानंतर बाडमेर न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. न्यायाधीश विमितासिंह यांनी कट रचणे, स्फोटके पेरणे आणि शस्त्र कायद्याखाली दोषांना ही शिक्षा सुनावली.

बाँबस्फोटाच्या कटातील आरोपींना ११ वर्षांनंतर सुनावली शिक्षा

sakal_logo
By
पीटीआय

बाडमेर (राजस्थान) - पाकिस्तानमधून आरडीएक्स व अन्य स्फोटके आणून पंजाबमध्ये स्फोटाचा कट रचण्याऱ्या दहा आरोपींना ११ वर्षानंतर बाडमेर न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. न्यायाधीश विमितासिंह यांनी कट रचणे, स्फोटके पेरणे आणि शस्त्र कायद्याखाली दोषांना ही शिक्षा सुनावली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या आरोपींनी ८ सप्टेंबर २००९ रोजी पाकिस्तानहून आरडीएक्स आणि दारूगोळा आणला होता. बाडमेरजवळ एका ठिकाणी बब्बर खालसा या संघटनेच्या सदस्यांना हा शस्त्रसाठा पुरविणार असल्याची माहिती तत्कालीन सदर पोलिस ठाणे प्रमुख रमेश शर्मा यांना मिळाली होती. पोलिसांनी तेथे छापा घालून आरोपींना अटक केली होती. 

Edited By - Prashant Patil