esakal | उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये भीषण स्फोट; अवैध फटाक्याच्या फॅक्टरीत 5 जणांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

bijnor.

या ठिकाणी अवैध पद्धतीने घरात फटाके बनवण्याचं काम सुरु  होतं. हा स्फोट इतका जबरदस्त होता की, यामध्ये हे घर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे.

उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये भीषण स्फोट; अवैध फटाक्याच्या फॅक्टरीत 5 जणांचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

लखनऊ : उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये आज गुरुवारी एक मोठी दुर्घटना घडली आहे. बक्शीवाला रोडवर फटाके बनवणाऱ्या फॅक्टरीमध्ये मोठा स्फोट घडल्याची घटना घडली आहे. या स्फोटात पाच लोकांचा मृत्यू झाला आहे. तर चार लोक गंभीररित्या जखमी झाले आहेत. बिजनौरमध्ये रहदारी आणि वस्तीच्या दरम्यान सुरु असणाऱ्या फॅक्टरीमध्ये हा स्फोट झाला आहे. बिजनौर जिल्ह्यातील कोतवाली क्षेत्रातील जादोवाला गावामध्ये आज गुरुवारी एका घरात हा भंयकर विस्फोट झाला. या ठिकाणी अवैध पद्धतीने घरात फटाके बनवण्याचं काम सुरु  होतं. हा स्फोट इतका जबरदस्त होता की, यामध्ये हे घर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. या ठिकाणी पाच जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. तर गंभीररित्या जखमी झालेल्या पाच जणांना आता दवाखान्यात नेण्यात आलं आहे. हा झालेला स्फोट इतका जोरदार होता की जवळपासचा सगळा परिसर या स्फोटाने हादरुन गेला आणि लोकांमध्ये भीती आणि दहशत पसरली. त्यानंतर घटनास्थळी मोठ्या संख्येने गर्जी जमा झाली. या घटनेची माहिती तातडीने पोलिसांनी दिली गेली. त्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचली असून बचावकार्य वेगाने सुरु करण्यात आले. यासंदर्भात अद्याप तरी कसल्याही प्रकारचे अधिकृत वक्तव्य जाहीर केलं नाहीये. 

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सध्या या पडझड झालेल्या घराच्या खालून आणखी काही मृतदेह शोधण्याचं काम सुरु आहे. फायर ब्रिगेड सहित जिल्हा प्रशासनाची टीम देखील घटनास्थळी पोहोचली आहे. असं म्हटलं जात होतं की या घरात विस्फोटक साहित्य  बनवलं जात होतं. ज्या घरात हा स्फोट झाला आहे, ते घर युसूफ नावाच्या व्यक्तीने भाड्याने घेतलं आहे. तो नऊ कामगारांसमवेत याठिकाणी फटाके बनवत होता. दुपारी अचानकच दारुला आग लागली. त्यामुळे जोरदार स्फोट झाला. या स्फोटामध्ये ते घर तर उद्ध्वस्त झालेच सोबत जागीच 5 जणांचा मृत्यू झाला आहे. इतर चार जण जबर जखमी झाले आहेत. 

- जगभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

युसूफ लायसन्सधारी फटाका विक्रेता असल्याचं म्हटलं जातंय. या घटनेनंतर घटनास्थळी पोहोचलेल्या युसूफला पोलिसांनी अटक केली आहे. तर उर्वरित जखमींना उपाचारासाठी जिल्हा रुग्णालयात भरती केलं गेलं आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, नहटौर मधील रहिवासी युसूफच्या नावावर ही फॅक्टरी सुरु आहे. डिसेंबर 2025 पर्यंत या फॅक्टरीचे लायसन्स रजिस्टर्ड आहे. यावेळी बोलताना डीएम रमाकांत पांडेय यांनी म्हटलं की फॅक्टरीमध्ये गुरुवारी कामगार काम करत होते. त्यावेळी फॅक्टरीला आग  लागली. या आगीत पाच लोकांचा मृत्यू झाला. ही आग कशी लागली यासंदर्भात सध्या तपास सुरु आहे. 

loading image