
नागपूर : कोचीहून दिल्लीकडे जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात बाँब असल्याचा ई-मेल कंपनीच्या अधिकृत ई-मेल आयडीवर प्राप्त झाल्यानंतर हे विमान मंगळवारी नागपूर येथे उतरविण्यात आले व विमानाची तपासणी करण्यात आली. या विमानात १५७ प्रवासी होते. विमानात बाँब नसल्याचे निष्पन्न झाल्यानंतर हे विमान दिल्लीकडे रवाना झाले.