Bomb Threat : इराणहून चीनकडे जाणाऱ्या फ्लाइटमध्ये बॉम्ब ठेवल्याचा अलर्ट, IAF सतर्क

Breaking News
Breaking News Sakal

Bomb Threat In Iran Passenger Jet:इराणहून चीनला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे. भारतीय हवाई दल या विमानावर लक्ष ठेवून आहेत. इराणचे हे विमान भारतीय हवाई हद्दीतून जात असताना भारतीय सुरक्षा यंत्रणांना त्यात बॉम्ब असल्याचा ट्रिगर अलर्ट मिळाला. त्यानंतर संबंधित विमान दिल्ली किंवा जयपूर येथे उतरण्यास परवानगी देण्याची विनंती वैमानिकाने केली होती. मात्र, भारताने या विमानाला इमर्जन्सी लँडिंगला परवानगी दिलेली नाही. 

तेहरानहून चीनमधील ग्वांगझूला फ्लाइट क्रमांक IRN 081 निघाले आहे. हे विमान भारतीय हद्दीत असताना यात बॉम्ब असल्याचा ट्रिगर भारतीय यंत्रणांना मिळाला. त्यानंतर हे विमान जयपूर किंवा दिल्ली येथे उतरवून द्या अशी विनंती करण्यात आली. मात्र, त्यास भारताने नकार दिला आहे. सध्या हे विमान चीनच्या दिशेने प्रवास करत आहे. बॉम्बच्या ट्रिगरनंतर सर्व यंत्रणा सतर्क झाल्या असून, भारतातील सर्व यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. सध्या या विमानावर भारतीय हवाई दलाकडून बारीक लक्ष ठेवले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com