Delhi Schools: दिल्लीतील ४५ शाळांना पुन्हा बाँबस्फोटाची धमकी; पालकांमध्ये भीतीचे वातावरण
Bomb Threats: दिल्लीतील तब्बल ४५ शाळांना या आठवड्यात पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाच्या धमक्या ई-मेलद्वारे प्राप्त झाल्या. या घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अनेकांनी मुलांना शाळेत पाठवणे टाळले.
नवी दिल्ली : दिल्लीतील सुमारे ४५ शाळांना या आठवड्यात चौथ्यांदा बाँबस्फोटांच्या धमक्या ‘ई मेल’द्वारे आल्या. अशा धमक्या वारंवार मिळत असल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये खळबळ उडाली त्यामुळे अनेक पालकांनी शुक्रवारी आपल्या मुलांना शाळेत पाठवलेच नाही.