PM Modi : राजस्थानच्या विकासाला चालना-पंतप्रधान नरेंद्र मोदी

विविध क्षेत्रातील पाच हजार कोटींच्या प्रकल्पांचे उद्‌घाटन
PM Modi
PM Modisakal

जोधपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लवकरच विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या राजस्थानात सुमारे पाच हजार कोटींच्या विविध विकासकामांचे भूमीपूजन व उद्‌घाटन केले. केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत हे यावेळी उपस्थित होते. या विकासकामांमुळे राज्यात विकासाला आणखी चालना मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

रस्ते, रेल्वे, विमान वाहतूक, आरोग्य व उच्च शिक्षण क्षेत्रांतील अनेक प्रकल्पांचा यात समावेश आहे. जोधपूरमधील अखिल भारतीय आयुविज्ञान संस्थेतील (एम्स) ३५० खाटांच्या ट्रॉमा सेंटर आणि गंभीर रूग्णांच्या उपचार केंद्राचेही पंतप्रधानांनी उद्‌घाटन केले.

पंतप्रधान आयुषमान भारत योजनेतंर्गत गंभीर रुग्णांसाठी अशी सात केंद्रे विकसित करण्यात येतील. या केंद्रांसाठी ३५० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या केंद्रांमुळे राजस्थानात जिल्हा स्तरावर रुग्णांना बहु-अनुशासनात्मक आणि सर्वसमावेशक उपचारातून आपत्कालीन प्रकरणांच्या व्यवस्थापनामध्ये सर्वांगीण दृष्टिकोन येईल.

जोधपूर विमानतळावर ४८० कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या नवीन इमारतीचे भूमिपूजनही पंतप्रधानांच्या हस्ते झाले. सुमारे २४ हजार चौ.मीटरवरील या इमारतीमुळे गर्दीच्या वेळी अडीच हजार रुग्णांना सुविधा उपलब्ध होतील. त्याचप्रमाणे, आयआयटी जोधपूरमधील कॅम्पसचेही पंतप्रधानांनी उद्‌घाटन केले. त्याचप्रमाणे, सुमारे १,४७५ कोटींच्या एकत्रित खर्चाच्या रस्ते विकास प्रकल्पांची पायाभरणीही पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आली.

पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले, की हे सर्व प्रकल्प राजस्थानचा आणखी विकास घडवून आणतील. राजस्थानात २०१४ पर्यंत केवळ ६०० कि.मी. लोहमार्गाचे विद्युतीकरण करण्यात आले होते. मात्र, गेल्या नऊ वर्षांत ३,७०० कि.मी. लोहमार्गाचे विद्युतीकरण झाले. मध्ये आपण राजस्थानला विकसित व समृद्ध राज्य बनविण्यासाठी एकत्र येऊयात, असे आवाहनही मोदींनी केले.

पेपरलीक माफियांकडून भविष्य उद्‌ध्वस्त : मोदी

पंतप्रधान मोदी यांनी राज्यातील गेहलोत सरकारवर भ्रष्टाचारावरून येथील सभेत जोरदार टीकास्त्र सोडले. पेपरलीक माफियाने राजस्थानातील लाखो युवकांचे भविष्य उद्‌ध्वस्त केले असून हे युवक नोकऱ्या मागत आहेत, अशी टीका त्यांनी केली. काँग्रेसला लोकांपेक्षा आपल्या मतपेटीची अधिक काळजी आहे, असा आरोपही मोदींनी केला.

पंतप्रधानांनी यावेळी लाल डायरीचा उल्लेख करत या डायरीत काँग्रेसच्या प्रत्येक भ्रष्टाचाराची माहिती असून ती उघड करण्यासाठी भाजपला सत्ता स्थापन करावी लागेल, असेही सांगितले. राजस्थानचे हकालपट्टी करण्यात आलेले मंत्री राजेंद्र गुधा यांच्याकडे ही कथित लाल डायरी असल्याचे म्हटले जात आहे. या डायरीत मुख्यमंत्री गेहलोत यांच्या आर्थिक व्यवहारांची माहिती असल्याचाही गुढा यांचा दावा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com