लष्कराच्या हालचाली होणार सुरळीत

सीमा रस्ते संघटनेचा (बीआरओ) प्रकल्प
वर्षाच्या अखेपर्यंत हा बोगदा कार्यरत होणार असल्याचे बीआरओच्या वतीने सांगण्यात आले.
वर्षाच्या अखेपर्यंत हा बोगदा कार्यरत होणार असल्याचे बीआरओच्या वतीने सांगण्यात आले. sakal

सेला, अरुणाचल प्रदेश : अरुणाचल प्रदेशच्या सीमावर्ती भागात तैनात असलेल्या सैन्याला आता सर्व संसाधने वेळेत उपलब्ध होण्यापासून ते हालचाली सुरू ठेवण्यास मदत मिळणार आहे. सीमा रस्ते संघटनेचा (बीआरओ) सर्वात महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणजेच सेला बोगद्या या पर्यायी मर्गामुळे हे शक्य होणार आहे. या वर्षाच्या अखेपर्यंत हा बोगदा कार्यरत होणार असल्याचे बीआरओच्या वतीने सांगण्यात आले.

या प्रकल्पाची सुरवात २०१९ मध्ये झाली. सुमारे १२ किलोमीटरचा हा प्रकल्प लष्कराच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाचा आहे. बर्फवृष्टी होते तेव्हा काही महिन्यांसाठी सेला पास बंद केला जातो. प्रकल्पामुळे आता लष्करी आणि नागरी वाहनांच्या हालचालींना कोणत्याही प्रकारच्या अडचणी उद्भवणार नाहीत. अशा प्रकल्पांमुळे स्थानिकांना रोजगाराची संधी मिळते. असे यावेळी बीआरओ सामान्य राखीव अभियंता दलातील (ग्रेफ) सहाय्यक कार्यकारी अभियंता निकिता चौधरी यांनी सांगितले.

कसा असेल हा पर्यायी मार्ग ?

- या प्रकल्पअंतर्गत दोन बोगदे, तसेच या दोन बोगद्याना जोडणारा रस्ता.

- दुसऱ्या बोगद्याला लागून एक समांतर बोगदा

- पहिला बोगदा ९८० मीटर लांब, दुसरा बोगदा १५५५ मीटर लांब आहे.

- पहिल्या बोगद्यापर्यंत पोहचण्यासाठी ७ किलोमीटरचा रस्ता

- दोन्ही बोगद्याना जोडणारा १.२ किलोमीटरचा रस्ता.

कोरोना मुळे झाला विलंब

कोरोना काळात साधन सामग्री उपलब्धता आणि कामगारांच्या आरोग्याच्या खबरदारीचा भाग म्हणून बोगद्याच्या कामात एक वर्षांचा खंड पडला. त्यात आता हवामानाच्या परिस्थितीमुळे या बोगद्याला पूर्ण करण्यास वेळ लागत असल्याने, येथील स्थानिक याबाबत काहीशी खंत व्यक्त करत आहेत.

हिवाळ्यात बर्फवृष्टी मुळे सेला पास बंद असल्याने तवांगपर्यंत पर्यटक पोहचू शकत नाहीत. परिणामी स्थानिकांच्या उत्पन्नावर थांबते. मात्र आता या बोगद्यामुळे पर्यटकांना देखील सहज तवांग पर्यंत जाण्याचा मार्ग उपलब्ध होईल. यामुळे स्थानिकांचे उत्पन्न सुरू राहील.

- रिंजिन खंडू, स्थानिक

भारतीय लष्कर आणि स्थानिकांच्या समस्यांना लक्षात घेता येथे बोगदा तयार करण्यासाठी बीआरओला जागा देण्याचे ठरविले. यासाठी 'ना हरकत प्रमाणपत्र' (एनओसी) ही पुरविण्यात आले आहे.

- केसन श्रींग, बोगद्यासाठी जमीन देणारे स्थानिक

धोरणात्मक महत्त्वपूर्ण प्रकल्प :

- तवांग तसेच पुढील क्षेत्रांना कोणत्याही प्रकारच्या हवामानाच्या परिस्थितीमध्ये जोडणार

- प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपर्यंत (एलएसी) जाण्याचा पर्यायी मार्ग

- तेजपुर ते तवांग दरम्यान प्रवासाचा वेळ होणार कमी

- महत्त्वाचे म्हणजेच १३५०० हजाराहून अधिक फूट उंचीवर असलेल्या सेला टॉप वरून पर्यटकांना धोकादायक प्रवास टाळणे शक्य

- यामुळे ९ किलोमीटरपेक्षा जास्त अंतर कमी होऊ शकेल

- बोगद्यात दोन्ही बाजूला सुरक्षित पादचारी मार्ग

- लष्कर व स्थानिकांकरिता पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी पॉवर केबल्स, ऑप्टिकल फायबर केबल्स आणि युटिलिटी लाइन्ससाठी डक्ट असतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com