विधानसभेत सापडल्या दारुच्या बाटल्या; बिहारचं राजकारण तापलं; नितीश कुमार म्हणतात...

Tesjashwi Yadav,Nitish Kumar
Tesjashwi Yadav,Nitish Kumarsakal

पाटणा : मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए आमदारांकडून राज्यामध्ये संपूर्ण दारुबंदीची शपथ घेण्यात आली होती. या शपथेच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज मंगळवारी बिहार विधानसभेच्या परिसरामध्ये दारूच्या अनेक रिकाम्या बाटल्या सापडल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेचा निषेध व्यक्त करत बिहार विधानसभेतील विरोधी पक्ष नेते तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना राजीनामा देण्याची मागणी केली.

Tesjashwi Yadav,Nitish Kumar
ममता बॅनर्जी बदलणार पक्षाचे नाव? लवकरच मोठ्या निर्णयाची शक्यता

तसेच राज्यामध्ये पूर्णपणे दारुबंदी लागू करण्याचीही मागणी केली. बिहारच्या विधानसभा परिसरातच दारुच्या रिकाम्या बाटल्या सापडल्यामुळे मोठा हलकल्लोळ माजला आहे. विधानसभेमध्ये कार्यवाही सुरु असतानाच हे प्रकरण उघडकीस आलं आहे. तेजस्वी यादव यांनी म्हटलंय की, हे प्रकरण गंभीर आहे. तसेच राज्यभरात अशा दारुच्या बाटल्या सापडत आहेत. दारुवर पूर्णपणे बंदी घातली गेली पाहिजे.

Tesjashwi Yadav,Nitish Kumar
ममता बॅनर्जी बदलणार पक्षाचे नाव? लवकरच मोठ्या निर्णयाची शक्यता

विधानसभेच्या पार्किंगमध्ये दारुच्या बाटल्या सापडल्यानंतर विधानसभेत हा मुद्दा चर्चेला आला. त्यावर प्रश्न उपस्थित केल्यानंतर नितीश कुमार यांनी म्हटलं की, मी उपमुख्यमंत्र्यांना विचारलं आणि त्यांनी सांगितलं की, दारुच्या बाटल्या परिसरात सापडल्या आहेत. हे अत्यंत वाईट आहे. हे कसं सहन केलं जाऊ शकतं? मी हे सभापतींसमोर सांगतो, त्यांनी परवानगी दिल्यास मी सर्वांना आजच तपासणी करण्यास सांगेन. जी व्यक्ती हे सगळं करत आहे, त्याला सोडलं जाणार नाही. त्यांनी विधानसभा अध्यक्षांना यासंदर्भातील तपासाचे आदेश देण्याची विनंती केली. नितीश कुमार यांनी म्हटलंय की, डीजीपी आणि चीफ सेक्रेटरींकडून यासंदर्भात तपास व्हायला हवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com