या भीषण घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार विषाची कुपीही तेथे आढळून आली आहे. त्यामुळे विष घेतले की नाही, हे उत्तरीय तपासणी केल्यानंतरच उलगडा होणार आहे.
बेळगाव : प्रेम प्रकरणातून (Love Affair) प्रियकराने प्रेयसीवर चाकूने हल्ला करून तिचा खून केला आणि स्वतःवरही चाकूने वार करून घेऊन जीवन संपवल्याची खळबळजनक घटना खासबाग सर्कलजवळील (Khasbagh Circle) घरात मंगळवारी (ता. ४) सायंकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.