माझा गर्भपात केला अन् तिच्यासोबत झोपला...

वृत्तसंस्था
Friday, 6 September 2019

दोघांचे काही वर्षांपासून प्रेमसंबंध. शरीरसंबंधामधून ती गर्भवती राहिली. मात्र, त्याने गर्भपात करायला लावला. तिच्या मनात संशयाची पाल चुकचुकली.

बालोद (छत्तीसगड): दोघांचे काही वर्षांपासून प्रेमसंबंध. शरीरसंबंधामधून ती गर्भवती राहिली. मात्र, त्याने गर्भपात करायला लावला. तिच्या मनात संशयाची पाल चुकचुकली तिने त्याच्यावर लक्ष ठेवले अन् तो दुसऱया युवतीसोबत नको त्या अवस्थेत आढळला.

पीडित युवतीने तक्रार दाखल केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुंडरदेही परिसरामध्ये राहणाऱया युवतीचे नात्यामधील युवकासोबत दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. पुढे त्यांचे शारिरीक संबंध आले. यामधून युवती गर्भवती राहिलेल्या युवतीने विवाह करण्याचा आग्रह धरला. मात्र, युवक तिला काही दिवसानंतर करू असे सांगू लागला. अखेर, त्याने गर्भपात करायला भाग पाडले. परंतु, प्रेयसीच्या मनात त्याच्यातील बदल जाणवत होता.

प्रेयसीने त्याच्यावर लक्ष ठेवण्याचे ठरवले. अनेकदा त्याचा माग काढत होती. एक दिवस तो दुसऱया युवतीसोबत नको त्या अवस्थेत आढळला. तिने त्याला रंगेहाथ पकडले. तिघांमध्ये जोरदार भांडण झाले. अखेर, युवतीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: boyfriend rape girlfriend and do abortion when she pregnant