

BRICS Global Cultural Partnership Brings 21 Countries Together to Explore Film Co Production Distribution and Technology Collaboration
sakal
-जयदीप पाठकजी
पणजी : एका देशातील माणसांच्या जगण्याची गोष्ट दुसऱ्या देशातील प्रेक्षकाला भावू शकते का? भाषेची, संस्कृतीची आणि भौगोलिक सीमांची बंधने ओलांडून चित्रपट माणसांना जोडू शकतो का? गोव्यात सुरू असलेल्या ५७व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील ‘फिल्म्स फ्रॉम ब्रिक्स’ हा विभाग या प्रश्नांची उत्तरे शोधताना दिसतो आहे. या विभागात समाविष्ट २१ चित्रपट केवळ वेगवेगळ्या देशांच्या कथा सांगत नाहीत, तर त्या देशांमधील सामाजिक विषमता, ऐतिहासिक संघर्ष, सांस्कृतिक अस्मिता, कौटुंबिक गुंतागुंत आणि बदलत्या समाजाचे वास्तवही पडद्यावर आणत आहेत. पहिल्या चार दिवसांत यापैकी काही चित्रपट दाखविण्यात आले असून, त्यावर साधक-बाधक चर्चाही झाली आहे.