
तेलंगणातील वनापार्टी जिल्ह्यातील चारलापल्ली गावात लग्न सुरु असतानाच नवरी बॉयफ्रेंडसोबत पळून गेली. लग्नाचा विधी सुरु असतानाच तिने मध्येच थांबत मला हे लग्न करायचे नसल्याचे सांगितले.
हैदराबाद : लग्नाचे ठिकाण ठरले, पाहुणे जमले, नवरा अन् नवरी लग्नाला उभे राहिले पण तिला लग्न सुरु असतानाच बॉयफ्रेंड दिसला मग काय तिने थेट त्याच्यासोबतच पळ काढल्याची चित्रपटाप्रमाणे घटना तेलंगणामध्ये घडली आहे.
तेलंगणातील वनापार्टी जिल्ह्यातील चारलापल्ली गावात लग्न सुरु असतानाच नवरी बॉयफ्रेंडसोबत पळून गेली. लग्नाचा विधी सुरु असतानाच तिने मध्येच थांबत मला हे लग्न करायचे नसल्याचे सांगितले. मंगळसूत्र बाधण्याचा कार्यक्रम बाकी असतानाच तिने हा निर्णय घेतला. यावेळी उपस्थित सर्वांनाच धक्का बसला. नातेवाईकांनी तिला खूप समजविण्याचा प्रय़त्न केला. मात्र, ती आपल्या मतावर ठाम राहिली आणि बॉयफ्रेंडसोबत लग्नाच्या ठिकाणाहून निघून गेली.
या मुलीच्या कुटुंबीयांना तिच्या बॉयफ्रेंडवर आरोप केला आहे. त्याला पाहिल्यामुळे तिने लग्नास नकार दिल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पळून गेल्यानंतर त्यांचा शोध घेण्यात येत असून, अद्याप त्यांच्या ठिकाणाबाबत माहिती मिळाली नसल्याचे समोर आले आहे.