नववधूने तब्येत ठीक नसल्याचं सांगत अंगाला स्पर्श करु दिला नाही, दहाव्या दिवशी दाखवले रंग!

Crime News In UP: उत्तर प्रदेशच्या ताज नगरमध्ये एक चकित करणारं प्रकरण समोर आलं आहे.
BRIDE
BRIDE

लखनऊ- उत्तर प्रदेशच्या ताज नगरमध्ये एक चकित करणारं प्रकरण समोर आलं आहे. नववधू दहाव्या दिवशी आपल्या प्रियकरासोबत मिळून पळून गेली आहे. विशेष म्हणजे नववधूने दहा दिवस आपल्या पतीला 'हनीमून' देखील करु दिला नाही. कारण, तिने प्रियकरासोबत मिळून पळून जाण्याचा प्लॅन बनवला होता. सदर घटनेमुळे पती आणि त्याच्या घरचे धक्क्यात आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, फतेहाबाद क्षेत्रातील एका गावातील मुलीचे २२ एप्रिल रोजी शमशाबाद येथे राहणाऱ्या मुलासोबत लग्न झाले होते.नववधू पळून गेल्याने नवऱ्या मुलाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला आहे. तुर्तास पोलीस फरार नववधू आणि त्याचा प्रियकराचा शोध घेत आहेत.

BRIDE
Crime News: महिलेला झाली 700 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, तिचा गुन्हा जाणून तुम्हालाही येईल चिड!

पतीने तक्रारीमध्ये आरोप केलाय की, लग्नाच्या पहिल्या दिवसापासूनच पत्नीचं वागणं संशयास्पद होतं. तिने तब्येत ठीक नसल्याचं सांगितलं होतं. तिने वेगवेगळी कारणं सांगत अंगाला स्पर्श देखील करु दिला नव्हता. त्यानंतर चार दिवसांनी ती आपल्या माहेरी गेली. पत्नीला परत घेऊन यायला पती तिच्या माहेरी गेला होता.

नवरी आणि प्रियकराचा होता प्लॅन

पती टू-व्हीलर घेऊन पत्नीला घ्यायला गेला होता. परत येत असताना पत्नीने डोकं दुखत असल्याचं सांगत गाडी थांबवली. तितक्यात त्या ठिकाणी काही तरुण आले. त्यांनी तक्रारदार तरुणाला घेरलं. याचवेळी नववधू नवऱ्याच्या बाईकवरुन उतरली अन् दुसऱ्या एका व्यक्तीच्या बाईकवर जाऊन बसली. पतीने तिला अडवण्याचा प्रयत्न केला पण, त्याचा काही फायदा झाला नाही. पती ओरडत होता, पण पत्नीने एकदाही मागे वळून पाहिलं नाही.

BRIDE
Nashik Crime News : गोळीबार करणाऱ्या टोळीविरोधात ‘मोक्‍का’; मोरख्या दर्शन दोंदेसमवेत 8 आरोपींवर कारवाईचाबडगा

सदर घटनेनंतर पतीने पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल करुन घेतली आहे. या प्रकरणी अधिक तपास केला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com