Wed, Feb 8, 2023

Brij bhushan Singh: लैंगिक शोषणाच्या आरोपांवर बृजभूषण सिंहांनी मांडली बाजू; म्हणाले, मी कारवाई...
Published on : 18 January 2023, 4:43 pm
नवी दिल्ली : रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे (WFI) अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांवर आता स्वतः बृजभूषण सिंह यांनी उत्तर दिलं आहे. आपल्यावरील लावण्यात आलेले आरोप गंभीर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. (Brij bhushan Sharan Singh gives first reaction on sexual abuse allegations)
लैंगिक शोषणाचे आरोप हे मोठे गंभीर आरोप आहेत. माझं स्वतःचं यामध्ये नाव आल्यानं मी याप्रकरणी कारवाई कशी करु शकतो? मी याप्रकरणी चौकशीसाठी तयार आहे, अशी प्रतिक्रिया बृजभूषण सिंह यांनी आपल्यावरील आरोपांविरोधात दिली आहे.