बृजभूषण सिंहांवर यापूर्वी 11 गुन्हे, पैकी ४ गंभीर; जाणून घ्या राजकीय प्रवास : Brij Bushan Singh | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

brij-bhushan-sharan-singh

Brij Bushan Singh : बृजभूषण सिंहांवर यापूर्वी 11 गुन्हे, पैकी ४ गंभीर; जाणून घ्या राजकीय प्रवास

नवी दिल्ली : रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे (WFI) अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. यासाठी दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर आंदोलनाला बसले आहेत. यानिमित्त बृजभूषण सिंह पुन्हा चर्चेत आले असून त्यांच्यावर यापूर्वी देखील ११ विविध प्रकारे गुन्हे दाखल आहेत, यापैंकी ४ गुन्हे गंभीर स्वरुपाचे आहेत.

हेही वाचा: Brijbhushan Singh: बृजभूषण सिंहांवर लैंगिक शोषणाचे आरोप; विनेश फोगाट, साक्षी मलिक यांचं आंदोलन

समाजवादी पार्टीकडून पहिल्यांदा लोकसभेवर

बृजभूषण सिंह हे उत्तर प्रदेशातील बाहुबली (गुंड) म्हणून ओळखले जातात. त्यांनी समाजवादी पार्टीत सामिल होत कैसरगंज इथून बसपाविरोधात पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवली होती. इथून ते ६३ हजार मतांनी निवडून आले.

त्यानंतर त्यांनी पक्ष बदलला पण त्यांचा प्रभाव कमी झाला नाही. पण समाजवादी पार्टीशी विचारधारा जुळत नसल्यानं त्यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ६ महिने आधी पक्षाला रामराम करत भाजपत प्रवेश केला. त्यानंतर बृजभूषण केसरगंजमधून भाजपच्या तिकीटावर पुन्हा ७३,००० मतांच्या फरकानं निवडून आले.

हेही वाचा: ACP Vishal Dhume: विनयभंगप्रकरणी एसीपी विशाल ढुमे निलंबित; मद्यधुंद अवस्थेत केलं गैरकृत्य

अनेक प्रकारचे गुन्हे दाखल

बृजभूषण सिंह दिवसेंदिवस राजकीय आणि पैशाच्या ताकदीवर बलवान होत गेले. दरम्यान, त्यांच्यावर विविध प्रकारचे ११ गुन्हे दाखल झाले यांपैकी ४ गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. पण या गुन्ह्यांमध्ये त्यांना कधीही शिक्षा झाली नाही.

१९९१ ते २०१९ या काळात त्यांनी आत्तापर्यंत ६ वेळा निवडणुका जिंकल्या आहेत. बृजभूषण सिंह आपल्या खास स्टाईलमुळं राजकारणात कायम चर्चेत असतात. त्यांचं लेखन, गायन आणि साहित्यात विशेष रुची आहे. त्यामुळेच ते कायम आपल्या भाषणांमध्ये गाणी आणि काव्य रचनांचा उल्लेख करतात.

हेही वाचा : दुधदुभते मुबलक हवे....मग हे नक्कीच वाचा

कुस्तीला रामराम पण राजकारणात हवा

बृजभूषण सिंह हे कुस्तीपटू होते पण अनेक वर्षांपूर्वीच त्यांनी कुस्ती सोडली. पण राजकारणापासून ते दूर गेले नाहीत. पण अनेकदा ते वादग्रस्त ठरले. ४ मे २०१९ त्यांनी बसपाच्या सुप्रिमो मायावती यांच्याविरोधाती वक्तव्यामुळं चर्चेत आले होते.

२४ जून २०१८ मध्ये त्यांनी काँग्रेसवर आरोप करताना काँग्रेस दहशतवाद्यांना जन्म घालतंय असा विधान केलं होतं. राजकारणात भक्कम स्थितीत असल्यानं बृजभूषण सिंह कुस्तीपासून दूर असले तरी सध्या राष्ट्रीय कुस्ती क्षेत्रावर त्यांचा प्रभाव आहे. कुस्ती फेडरेशनचे ते अध्यक्ष आहेत.