Shashi Tharoor
Shashi Tharoor

Shashi Tharoor: ब्रिटन अन् ऋषी सूनक यांचं शशी थरुरांकडून कौतूक; म्हणाले, विलक्षण...

भारतीय वंशाचे ऋषी सूनक हे ब्रिटनचे पंतप्रधान बनले आहेत.

नवी दिल्ली : भारतीय वंशाचे ब्रिटनचे खासदार ऋषी सूनक हे ब्रिटनचे पंतप्रधान बनले आहेत. त्यामुळं काँग्रेस नेते शशी थरुर यांनी त्याचं कौतुक केलं आहे. त्याचबरोबर ब्रिटनच्या खासदारांनी त्यांना या पदापर्यंत पोहोचवल्याबद्दल तिथल्या राजकीय व्यवस्थेचं आणि नागरिकांचंही कौतुक केलं आहे. (Britain and Rishi Sunak appreciation by Shashi Tharoor Said fantastic)

थरुर म्हणाले, ऋषी सूनक ब्रिटनचे पंतप्रधान बननं हे अनेक पातळ्यांवर विलक्षण आहे. आपण पाहू शकता की याद्वारे ब्रिटनने त्यांच्या वर्णद्वेषाची भूमिका मागे टाकून विस्तारीत भूमिका अंगिकारली आहे. इतर धार्मिक भावना जोपासणाऱ्या लोकांना सामावून घेण्याची आणि त्यांना आपल्या राजकीय व्यवस्थेत प्रवेश देण्याची जबरदस्त तयारी त्यांनी दर्शविली आहे. पण यासाठी सर्वात वर त्यांनी संबंधित व्यक्तीची योग्यता पाहिली आहे. त्यामुळं आपण जात, धर्म, वर्ग, भाषा आणि प्रदेश याच्या पलीकडे जाऊन पाहण्याची तयारी ठेवली पाहिजे. देशानं काय बक्षीस द्यायला हवं तर ते म्हणजे गुणवत्ता.

संसदेत भाजपचा एकही मुस्लिम खासदार नाही

भाजपसारख्या पक्षाचा संसदेत आज एकही मुस्लिम खासदार नाही, ही धक्कादायक परिस्थिती आहे, जी पूर्वी कधीही नव्हती. भाजपचे समर्थक असलेले लोक दुसऱ्या धर्माचा पंतप्रधान किंवा इस्लामिक किंवा ख्रिश्चन धर्माचा भाजपचा मुख्यमंत्री अशी कल्पना करू शकतात का? मला तरी असं काही होईल असं वाटत नाही, असंही थरुर यांनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com