प्रेमातंच नाही तर आजारतही होतो Heart Break! वाचा काय आहे ब्रोकन हार्ट सिंड्रोम

ब्रेकअप झाल्यावर हार्ट ब्रेक होतं तुम्ही ऐकलं असेल पण आजारातही हार्ट ब्रेक होतं, माहितीये काय आहे ब्रोकन हार्ट सिंड्रोम?
Not in love but in disease heart breaks, read what is heart broken syndrome
Not in love but in disease heart breaks, read what is heart broken syndromeesakal
Updated on

अलीकडे तरूणांमध्ये पॅचअप-ब्रेकअप फार चालत असतं. त्यातल्या त्यात एखाद्याचा पार्टनर सोडून गेला किंवा पार्टनरने दगा दिला की संतातपलेली तरूण पिढी माझं ब्रेक अप झालं किंवा हार्ट ब्रेक झालं असं म्हणत असते. मात्र हा विषय वगळता आजारामध्येही खरंखुर हार्ट ब्रेक होत असतं. होय! वाचताना तुम्हाला आश्चर्य वाटत असलं तरी हे खरं आहे. त्यामुळे ब्रोकन हार्ट सिंड्रोम नेमकं काय असतं आणि त्याची लक्षणे काय आहे ते जाणून घेणं फार महत्वाचं ठरतं. (Not in love but in disease heart breaks, read what is heart broken syndrome)

हृदय हा शरीरातील फार नाजूक भाग असतो. साईन्टिफिक भाषेत ब्रोकन हार्ट सिंड्रोम म्हटल्या जाणाऱ्या या आजाराची ओळख पहिल्यांदा १९९० मध्ये जपानमध्ये झाली होती. जेव्हा एखाद्या व्यक्तीला अचानक इमोशनल स्ट्रेस, भीती किंवा शॉक लागतो तेव्हा त्याचे हार्ट मसल्स कमकुवत होत जातात आणि हृदयाच्या नसांवर अधिक ताण निर्माण होतो. हृदयावर ताण निर्माण झाल्याने हार्ट अटॅक येण्याचा धोका वाढतो. उदा. एखाद्या व्यक्तीने त्याचा जवळचा व्यक्ती गमावला तर त्याच्या दु:खात तो सतत असतो. मात्र याचा परिणाम थेट आरोग्यावर होत असतो. तसेच एखादा माणूस सतत निराश राहात असेल तर त्यालाही हा आजार उद्भवू शकतो.

ब्रोकन हार्ट सिंड्रोमची कारणे

ब्रोकन हार्ट सिंड्रोम हा स्ट्रेस हार्मोन अॅड्रेनालाइन वाढल्याने होऊ शकतो. शास्त्रज्ञांच्या मते हे स्ट्रेस हार्मोन हृदयाच्या पेशींना एवढं ताणून टाकतात की त्यानंतर मांसपेशीमध्ये योग्य प्रमाणात रक्तपुरवठाही होणं कठीण असतं. जॉन हॉपकिंस मेडिसिनच्या मते, अँड्रेनालाइट थेट तुमच्या हार्ट पेशींना जोडले असतात. ज्यामुळे अधिक प्रमाणात हृदय पेशींमध्ये कॅल्शियम जाऊ लागतं. अधिक कॅल्शियम पोहोचल्याने हृदय पेशी व्यवस्थित काम करत नाहीत.

Not in love but in disease heart breaks, read what is heart broken syndrome
Relation Breakup होण्याच्या मार्गावर आहे? गर्लफ्रेंडला मनवण्याचे 6 मार्ग

ब्रोकन हार्ट सिंड्रोमची लक्षणे

छातीत दुखणे

श्वास घेण्यास त्रास होणे

घाम येणे

गरगरल्यासारखे वाटणे

ब्रोकन हार्ट सिंड्रोमचा धोका कोणाला?

जेव्हा एखाद्याने त्याच्या हृदयाच्या फार जवळचा व्यक्ती गमावला असतो तेव्हा एखाद्याला हार्ट ब्रोकन सिंड्रोम होऊ शकतो. याशिवाय एखादं जवळचं नातं तुटल्यास, मानसिक तणाव, पैशांच्या अडचणी, नोकरी सुटणे, घरघुती भांडण यांसारख्या कारणांनी हार्ट सिंड्रोमच्या समस्या उद्भवू शकतात. असा स्थितीत जे असतात त्यांना ब्रोकन हार्ट सिंड्रोम होण्याचा धोका जास्त असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com