बेळगाव : कौटुंबिक वादातून (Family Dispute) सख्ख्या मोठ्या भावाने लहान भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना धामणे येळ्ळूर (ता. बेळगाव) येथे काल (ता. १६) दुपारी बारा ते साडेबारा या दरम्यान घडली. लक्ष्मण भरमा बाळेकुंद्री (वय २८) असे मृत भावाचे नाव असून, संशयित आरोपी मोठा भाऊ मारुती भरमा बाळेकुंद्री (वय ३०, दोघेही रा. धामणे येळ्ळूर, ता. बेळगाव) आहे.