BRS MLA Lasya Nanditha dies in road accident in  in Telangana
BRS MLA Lasya Nanditha dies in road accident in in Telanganaesakal

Lasya Nanditha: कारवरचं नियंत्रण सुटलं अन्...; महिला आमदाराचा अपघातात जागीच मृत्यू

Lasya Nanditha: या अपघातात आमदार लस्या नंदिता गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात त्यांचा कार चालकही गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Lasya Nanditha: सिकंदराबाद कँटमधील बीआरएस आमदार लस्या नंदिता यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. आमदार त्यांच्याच गाडीतून प्रवास करत होते. संगारेड्डीतील अमीनपूर मंडल भागात सुलतानपूर आऊटर रिंग रोडवर त्यांच्या कारचे नियंत्रण सुटले आणि दुभाजकावर आदळली.

या अपघातात आमदार लस्या नंदिता गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात त्यांचा कार चालकही गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बीआरएस प्रमुख के. चंद्रशेखर राव यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. बीआरएसचे कार्याध्यक्ष केटी रामाराव यांनीही नंदिताच्या निधनावर शोक व्यक्त केला.

दरम्यान, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी ट्विट केले की, 'कॅन्टच्या आमदार लस्या नंदिता यांच्या अकाली निधनाने मला खूप धक्का बसला आहे. नंदिताचे वडील दिवंगत सायन्ना यांच्याशी माझे जवळचे नाते होते. गेल्या वर्षी याच महिन्यात त्यांचे निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या मनापासून संवेदना, त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

BRS MLA Lasya Nanditha dies in road accident in  in Telangana
Manohar Joshi Passed Away: सिव्हिल इंजिनिअर ते शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री...मनोहर जोशी यांची कारकीर्द

या अपघाताची काही फोटो समोर आली आहेत. त्यात लस्याच्या कारचा चक्काचूर झाल्याचे दिसून येत आहे. आमदार लस्या नंदिता या अवघ्या ३६ वर्षांच्या होत्या. (Latest Marathi News)

फेब्रुवारी २०२३ मध्ये वडिलांचे निधन-

लस्या नंदिताच्या वडिलांचे गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये निधन झाले होते. यानंतर तेलंगणामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत बीआरएसने लस्या नंदिता यांना सिकंदराबादमधून उमेदवारी दिली आणि ती जिंकली. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत नंदिता यांनी भाजप उमेदवाराचा १७ हजार मतांनी पराभव करत विजय मिळवला होता.

BRS MLA Lasya Nanditha dies in road accident in  in Telangana
PM Modi Varanasi Visit: PM मोदींनी मध्यरात्री मतदारसंघातील रस्त्यांची केली पाहणी; सीएम योगीही सोबत, Photo Viral

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com