
पाकिस्तान ते तेलंगाणा via पंजाब; दहशतवाद्यांच्या तस्करी कारवाया सुरूच
चंदीगढ : पाकिस्तानच्या भारतातील कुरापती दिवसेंदिवस वाढतंच असून आज सकाळी पुन्हा पाकिस्तानकडून येणारे ड्रोन भारतीय सुरक्षा दलाने पाडले आहे. या ड्रोनमधून हेरॉईनची तस्करी करण्यात येत होती आणि ते पंजाबमधील अमृतसर येथे नेले जात होते असे सुरक्षा दलाच्या जवानांनी सांगितलं आहे.
(BSF shoots down drone carrying heroin in Punjab's Amritsar)
पाकिस्तानातून अंमली पदार्थांचे तस्करी करणारे ड्रोन अनेकवेळा भारतीय सैन्याकडून पाडण्यात आले आहेत. आज सकाळी पाडण्यात आलेल्या ड्रोनमध्ये १०.६७ किलो वजनाचे हेरॉईन आढळले असून जवांनांकडून जप्त करण्यात आलं आहे. तस्करी करण्यात आलेले अंमली पदार्थ देशातील विविध भागात जात असल्याचं समोर आलं आहे. मागील काही दिवसांत ड्रोनमधून आलेले शस्त्रे तेलंगाणामध्ये पाठवण्यात आल्याचं काही दिवसांपूर्वी पकडण्यात आलेल्या दहशतवाद्यांच्या चौकशीतून समोर आलं आहे.
"पंजाबमधील सुरक्षा दलाच्या जवानांना पाकिस्तानच्या बाजूने येत असलेल्या ड्रोनची माहिती मिळाली आणि सुरक्षा दलाच्या जवानांनी ते पाडले. ड्रोनमध्ये हेरॉईनचे ९ पाकीटं आढळले असून त्यांचं वजन १०.६७ किलो असल्याची माहिती सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी दिली आहे.
हेही वाचा: Khalistani Flag: हिमाचलमध्ये सीमाबंदी; पोलिस हायअलर्टवर
दरम्यान पाकिस्तानातून ड्रोनद्वारे शस्त्रे आणि अंमलीपदार्थांची तस्करी केली जात असल्याची कबूली काही दिवसांपूर्वी पकडण्यात आलेल्या संशयित दहशतवाद्यांनी दिली होती. काही दिवसांपूर्वी हरियाणाच्या कर्नाल भागांतून चार संशयितांना अटक केली होती. त्यांच्याकडे अंमली पदार्थ आणि शस्त्रे आढळून आले होते. त्यांच्या चौकशीदरम्यान पाकिस्तानातून ड्रोनद्वारे शस्त्रे आणि अंमली पदार्थ येत असतात आणि भारतातील विविध भागांमध्ये पोहोचवले जातात असं त्यांनी सांगितलं होतं.
पाकिस्तानातील बब्बर खालसा आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादी हरविंदर सिंग उर्फ रिंडा हे ड्रोन वापरून पाकिस्तानातून अंमली पदार्थ आणि शस्त्रास्त्रे पाठवायचे, पाकिस्तानातून आलेले सर्व पदार्थ आणि शस्त्रे वितरीत करण्याचं काम या आरोपींवर असायचं. आरोपी पाकिस्तानातून आलेले ड्रग्स पंजाबमधील एका व्यापाऱ्याला विकून पैसे घेत असत तर स्फोटके, शस्त्रे आणि दारूगोळा नेमून दिलेल्या ठिकाणी पोहोच करत असत.

Drugs
हेही वाचा: SCच्या 2 नव्या न्यायाधीशांचा शपथविधी; 30 महिन्याच्या प्रतिक्षेनंतर जागा भरल्या
तेलंगाणा, महाराष्ट्र्, हरियाणा आणि पंजाबमधील अनेक ठिकाणी तस्करी केलेला माल पोहोचवला जात असून गुरप्रीत, अमनदीप, परमिंदर आणि भूपिंदर अशी या पकडण्यात आलेल्या संशयित दहशतवाद्यांची नावे आहेत. दरम्यान पाकिस्तानकडून येणाऱ्या ड्रोनची संख्या कमी होताना दिसत नसून सीमा सुरक्षा दलांच्या जवानांकडून हे कट उधळले जात आहेत.
Web Title: Bsf Shoots Down Drone Heroin Pakistan Punjab Telangana
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..