
नवी दिल्ली : BSNL, MTNLचं एकत्रिकरण थांबवा अशी कळकळीची मागणी बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांचं बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे. उलट एमटीएनएलचं २६,००० कोटींच्या कर्जाचं अधिग्रहण करावं तसेच बीएसएनएलला आर्थिक मदत करावी, अशी मागणीही या कर्मचाऱ्यांनी केली आहे. (BSNL Employees Union appeal PM Modi to drop proposal to merge MTNL with BSNL)
काही वर्षांपूर्वीच बीएसएनआल आणि एमटीएनएलच्या एकत्रिकरणाचा प्रस्ताव सरकारनं मांडला होता. पण हा मुद्दा पुन्हा एकदा टेलिकॉम विभागातील टॉपच्या अधिकाऱ्यांसमोर चर्चेसाठी टेबलावर यावा अशी इच्छा बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
दूरसंचार विभागातील एका उच्चपदस्थ सूत्राच्या माहितीनुसार, या क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेमुळं आर्थिक तणावाचा सामना करणाऱ्या दोन्ही संस्थांचं विलीनीकरण करण्याच्या शक्यतेवर नुकत्याच एका उच्चस्तरीय बैठकीत चर्चा झाली. दुसर्या अधिकाऱ्यानं सांगितले की, पहिल्या टप्प्यात BSNL ही MTNLच्या गुडगाव, नोएडा आणि फरीदाबादमध्ये मोबाइल ऑपरेशन्स घेण्यास उत्सुक आहे, इथं आधीपासूनच बीएसएनआल लँडलाइन आणि ब्रॉडबँड सेवा देत आहे.
दुसरा पर्याय MTNLच्या दिल्ली आणि मुंबईतील मोबाईल ऑपरेशन्सच्या अधिग्रहणाचा असू शकतो. तत्कालीन दूरसंचार सचिव जेएस दीपक यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक २-३ आठवड्यांपूर्वी झाली होती आणि त्यांच्या या कल्पनेला पुन्हा एकदा महत्त्व प्राप्त झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.