esakal | वाढदिवसानिमित्त बसपा प्रमुख मायावतींची मोठी घोषणा
sakal

बोलून बातमी शोधा

mayawati.

मायावती यांचा आज 65 वा वाढदिवस आहे.  

वाढदिवसानिमित्त बसपा प्रमुख मायावतींची मोठी घोषणा

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

लखनऊ- बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुका कोणासोबतही आघाडी न करता लढण्याचा निर्णय घेतला आहे. मायावतींचे म्हणणं आहे की, आघाडीमुळे त्यांना नुकसान होत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये बसपाचा विजय निश्चित आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. मायावती यांचा आज 65 वा वाढदिवस आहे.   

मायावती यांनी कोरोना लसीकरणाला सुरुवात करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. पण, त्यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारांना आवाहन केलंय ती त्यांनी सर्वांना मोफतमध्ये लस पुरवावी. मायावती यांनी वचन दिलंय की राज्यात त्यांचे सरकार बनल्यास यूपीतील प्रत्येक नागरिकाला मोफतमध्ये कोरोनाची लस दिली जाईल. 

वाढदिवस जनकल्‍याणकारी दिवस म्हणून साजरा करा

मायावती यांनी आपल्या समर्थकांना वाढदिवस जनकल्याणकारी दिवस म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी ट्विट केलंय की, 15 जानेवारीला माझा 65 वा वाढदिवस आहे. सध्या कोरोनाची महामारी सुरु आहे. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी माझा वाढदिवस कोरोना नियमांचे पालन करत साजरा करावा. तसेच गरिब पीडित, अति-गरिब आणि असहाय्य लोकांची आपल्या क्षमतेनुसार मदत करुन ‘जनकल्याणकारी दिवस‘ स्वरुपात साजरा करावा. 

यूपीमध्ये 2020 मध्ये होणार आहेत निवडणुका

उत्तर प्रदेशमध्ये 2022 ला विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष तयारी करत आहे. नुकतेच राष्ट्रीय समाज पार्टीचे अध्यक्ष ओमप्रकाश राजभर यांनी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM)चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांची लखनऊमध्ये भेट घेतली होती. 2014 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये बसपाने शून्य, 2017 च्या विधानसभा निवडणुकीममध्ये 20 पेक्षा कमी जागा जिंकल्या होत्या.