Budget 2020:'बजेटमध्ये तेच ते आणि तेच ते'; राहुल गांधींची टीका

टीम ई-सकाळ
Saturday, 1 February 2020

बजेटचे भाषण संपल्यानंतर संसदेतून बाहेर पडणाऱ्या राहुल गांधी यांना माध्यमांनी घेरलं. त्यावेळी राहुल यांनी बजेट संदर्भात प्रतिक्रिया दिली.

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या बजेटवर जोरदार टीका केली. अर्थमंत्र्यांच्या भाषणात काहीच नव्हतं. बजेटमध्ये केवळ चर्चाच झाली. हाती काहीच आलं नाही, अशा शब्दांत राहुल गांधी बजेटवर प्रतिक्रिया दिली आहे.

अर्थसंकल्पाविषयीच्या इतर बातम्यांसाठी येथे ► क्लिक करा

राहुल गांधी काय म्हणाले
बजेटचे भाषण संपल्यानंतर संसदेतून बाहेर पडणाऱ्या राहुल गांधी यांना माध्यमांनी घेरलं. त्यावेळी राहुल यांनी बजेट संदर्भात प्रतिक्रिया दिली. राहुल गांधी म्हणाले, 'निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पी भाषणात कोणतिही स्ट्रॅटेजी दिसली नाही. अडीच तासांच्या भाषणात तेच ते ऐकायला मिळाले. मुळात ही सरकारची मानसिकता आहे. केवळ चर्चा करायची. विषयांना केवळ हाताळण्यात आलंय. कोणताही मुख्य विचार दिसला नाही. देशाच्या इतिहासातील सर्वांत अर्थसंकल्पी भाषण असूनही त्यातून काही मिळालं नाही. बेरोजगारी आणि अर्थव्यवस्थेची अवस्था हे सगळ्यांत मोठे प्रश्न  आज देशाच्या पुढे आहेत. पण, या विषयांवर अर्थमंत्र्यांच्या भाषणात काहीच हाती आलं नाही.'
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: budget 2020 congress leader rahul gandhi reaction nirmala sitharaman