Building Collapse in Delhi : बांधकाम सुरू असताना दोन मजली इमारत कोसळली अन्....; दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू, एक तरुण गंभीर जखमी

Building Collapse in Delhi : दिल्लीत बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास बांधकाम सुरू असलेली दोन मजली इमारत कोसळली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर एक तरुण गंभीर जखमी झाला.
Building Collapse in Delhi
Building Collapse in Delhi Esakal

Building Collapse in Delhi : देशाची राजधानी दिल्लीतून एक मोठी दुर्घटना घडली आहे. बांधकाम सुरू असलेली जुनी इमारत अचानक कोसळली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. जखमी व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांनी सांगितले कीबांधकाम सुरू असलेली दोन मजली इमारत कोसळल्याची घटना मध्यरात्री २:१६ च्या सुमारास घडली.

मध्यरात्रीच्या वेळी झालेल्या या अपघातामुळे स्थानिक लोकांना सुरुवातीला काहीच समजले नाही, नंतर त्यांना एक घर कोसळल्याचे समजले. अपघाताची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. यानंतर मदत आणि बचाव कार्य राबविण्यात आले.

Building Collapse in Delhi
ST Bus Accident : जिंतूर-सोलापूर एसटीचा अपघात; २१ प्रवासी जखमी

मिळालेल्या माहितीनुसार, ईशान्य दिल्लीतील वेलकम भागातील कबीर नगरमध्ये इमारत कोसळल्याने दोन जणांचा चिरडून मृत्यू झाला आहे. या अपघातात एक जण जखमी झाल्याचीही माहिती आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री उशिरा २.१६ वाजता २ मजली जुनी बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळल्याची माहिती मिळाली. पहिल्या मजल्यावर कोणीही राहत नव्हते. तळमजल्यावर काम सुरू होते. ढिगाऱ्याखाली तीन मजूर गाडले गेले. तिघांनाही बाहेर काढण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. अपघातात जखमी झालेल्या दोघांना जीटीबी रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले.

Building Collapse in Delhi
Bus Accident In China: बस बोगद्याच्या भिंतीला धडकल्याने 14 ठार, 37 जखमी; चीनमध्ये घडली घटना

तिसऱ्या मजुराची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर जीटीबी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शाहीद असे इमारतीच्या मालकाचे नाव आहे. त्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याप्रकरणी कायदेशीर कारवाई केली जाईल, असे दिल्ली पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या पुढील तपास सुरू आहे.

मृत आणि जखमींची ओळख पटली

कबीर नगर येथील घर कोसळण्याच्या घटनेतील मृतांची ओळख पटली आहे. या अपघातात अर्शद, वय ३० वर्षे, तौहीद वय 20 वर्ष यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर रेहान वय 22 वर्ष हा गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

Building Collapse in Delhi
Rajasthan Train Derailed: मोठा अनर्थ टळला! अजमेरमध्ये साबरमती एक्सप्रेस आणि मालगाडीमध्ये भीषण धडक, ४ डब्बे रूळावरून घसरले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com