

Experience India’s Roots: Rural Homestays Gain Popularity Among Foreign Tourists
esakal
मध्यप्रदेश पर्यटन विभागाने पर्यटनाच्या क्षेत्रात एक नवा आणि यशस्वी प्रयोग केला असून, रीवा जिल्ह्याने आता जगभरातील पर्यटकांना भुरळ घातली आहे. अलिशान हॉटेल्स आणि चकचकीत दुनिया सोडून आता देश-विदेशातील पाहुणे थेट गावांकडे वळत आहेत. रीवाच्या पूर्वा धबधब्यापाशी सुरू झालेले 'होम स्टे' पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत. रीवामधील ग्रामीण पर्यटनाने एका नव्या उंचीला गवसणी घातली आहे. निसर्गाच्या कुशीत राहण्याची ओढ पर्यटकांना इथपर्यंत खेचून आणत आहे.