

Bundelkhand Fort
sakal
उत्तर प्रदेशातील बुंदेलखंडचे वैभव असलेल्या ऐतिहासिक किल्ल्यांचे आता भाग्य बदलणार आहे. योगी सरकारने बांदा येथील कालिंजर किल्ला आणि महोबा येथील मंगलगढ किल्ला यांना जागतिक दर्जाची पर्यटन स्थळे बनवण्यासाठी कंबर कसली आहे. विशेष म्हणजे, या ऐतिहासिक वास्तूंच्या मूळ संरचनेला धक्का न लावता, त्याभोवती आधुनिक सुविधांचे जाळे विणले जाणार आहे.