नोकरशाही उचलते नेत्यांच्या चपला : उमा भारती

भाजप नेत्या उमा भारती यांच्या वक्तव्यामुळे वाद
Uma Bharti
Uma Bhartisakal
Updated on

भोपाळ ः नोकरशाही म्हणजे बाकी काही नाही तर आमच्या चपला उचलण्यासाठीच ते आजूबाजूला असतात, असे वक्तव्य भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांनी केले. तसा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.

इतर मागासवर्गीयांचे (ओबीसी) एक शिष्टमंडळ उमा भारतीय यांना त्यांच्या निवासस्थानी भेटले. त्यावेळी त्या म्हणाल्या की, अधिकाऱ्यांची काहीही लायकी नाही. ते फक्त आमच्या चपला उचलण्यासाठी असतात. आम्ही त्यांना तसे करू देतो.

Uma Bharti
"...तर तोकडे कपडे घालणारी राखी गांधींपेक्षा महान"

नोकरशाहीचे राजकारण्यांवर नियंत्रण असते असे तुम्हाला वाटते का, असा सवाल करून त्या म्हणाल्या की, अशी सगळी चर्चा मूर्खपणाची आहे. प्रारंभी खासगी पातळीवर चर्चा होते. मग अधिकाऱ्यांकडून फाइल तयार केली जाते आणि आम्हाला ती दिली जाते. मला विचारा तुम्ही, कारण मी ११ वर्षे केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे. अधिकारी आमच्यावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. त्यांची पात्रता तरी काय? आम्ही त्यांना पगार देतो. आम्ही त्यांना पदे देतो. आम्ही त्यांना बढती देतो. आम्ही त्यांना पदावनतीही देतो. ते काय करू शकतात ? सत्य हे आहे की आम्ही त्यांचा राजकारणासाठी वापर करतो...

उमा भारती यांच्याकडे या शिष्टमंडळाने जातनिहाय जनगणना आणि खासगी नोकऱ्यांत आरक्षण या मागण्यांचे मुद्दे मांडले.

काँग्रेसकडून वक्तव्याचा निषेध

भाजप नेत्या उमा भारती यांच्या वक्तव्याचा काँग्रेसने निषेध केला आहे. अधिकारी राजकारण्यांचा चपला खरोखरच उचलतात का याविषयी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान खुलासा करणार का, असा सवाल काँग्रेस नेते के. के. मिश्रा यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com