सिद्धूंच्या पदग्रहण कार्यक्रमासाठी जात होते; अपघातात 3 काँग्रेस नेत्यांचा मृत्यू

सिद्धूंच्या पदग्रहण कार्यक्रमासाठी जात होते; अपघातात 3 काँग्रेस नेत्यांचा मृत्यू
Updated on
Summary

पंजाबच्या मोगा जिल्ह्यात शुक्रवारी बस अपघातात तीन काँग्रेस कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय दुर्घटनेत 20 लोक जखमी झाल्याची माहिती आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन बसची धडक झाली.

नवी दिल्ली- पंजाबच्या मोगा जिल्ह्यात शुक्रवारी बस अपघातात तीन काँग्रेस कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय दुर्घटनेत 20 लोक जखमी झाल्याची माहिती आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन बसची धडक झाली. यात एक स्टेट ट्रांन्सपोर्टची बस होती, तर दुसरी प्रायवेट मिनी बस होती. मोगा जिल्ह्यातील एसएसपी हरमनबीप सिंह गिल यांनी म्हटलं की, जखमी लोकांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अपघातात जखमी झालेले काँग्रेस कार्यकर्ते पंजाब काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पदग्रहण कार्यक्रमात भाग घेण्यासाठी निघाले होते. (bus accident in Moga dist in which 3 Congress workers have reportedly died many persons are injured Navjot Singh Sidhu)

पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी या अपघाताप्रकरणी दु:ख व्यक्त केले आहे. अमरिंदर सिंग म्हणाले की, मोगा जिल्ह्यातील बस अपघातात तीन काँग्रेस कार्यकर्त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे, अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे मला दु:ख झाले आहे. मी मोगाच्या डीसीला आदेश दिलाय की तात्काळ दुर्घटनेत जखमी लोकांच्या उपचारासाठी मदत करावी आणि संपूर्ण प्रकरणाची रिपोर्ट राज्य सरकारला पोहोचवावी.

दरम्यान, चंदीगड येथील पंजाब काँग्रेस भवनात पंजाब काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू यांच्या पदग्रहण समारंभाची जोरदार तयारी सुरु आहे. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग हे पंजाब भवनातील कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. यासाठी चार कॅबिनेट मंत्री या कार्यक्रमाच्या तयारीत गुंतले आहेत. यावेळी सिद्धू आपल्या चार कार्यकारी अध्यक्षांसोबत पंजाब काँग्रेसचं अध्यक्षपद स्विकारणार आहेत. अमरिंदर सिंग पदग्रहण समारंभाला उपस्थिती लावणार असल्याने सिद्धू आणि त्यांच्यातील वाद निवळला असल्याची चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com