विजेच्या तारेने केला घात, बसमधील 6 प्रवाशांचा होरपळून मृत्यू

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 17 January 2021

शनिवारी रात्री बसला भीषण आग लागल्याची घटना घडली.

राजस्थानमध्ये जलोर इथं शनिवारी रात्री बसला भीषण आग लागल्याची घटना घडली. या दुर्घटनेत 6 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसचा विजेच्या तारेला स्पर्श झाला. त्यामुळे शॉर्टसर्किट होऊन बसला आग लागली. बसमधील प्रवाशांना काही समजण्याआधी आगीने रौद्र रूप धारण केले होते. या आगीत अडकलेल्या 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर 7 जण गंभीर जखमी झाले. 
 

दुर्घटनेनंतर पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. जखमींना रुग्णालयात नेण्यात आले असून त्यांच्यावर जोधपूरमध्ये उपचार सुरू आहेत. गेल्या 2 दिवसातील ही दुसरी भीषण दुर्घटना आहे. शुक्रवारी धारवडमध्ये मिनी बसला अपघात झाला होता. त्यात 11 महिला डॉक्टर मैत्रिणींचा मृत्यू झाला.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bus caught fire after coming in contact with electric wire in Maheshpur of Jalore district