
उत्तरकाशी येथे बस दरीत कोसळली, 25 भाविकांचा मृत्यू
उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात एक मोठा भीषण रस्ता अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. रविवारी संध्याकाळी उशिरा एक बस एनएच-९४ वर डामटापासून दोन किमी पुढे जानकीचट्टीजवळ खोल दरीत कोसळली. बसमधील 25 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. बसमधील लोक मध्य प्रदेशातील यात्रेकरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
मध्य प्रदेशातील पन्ना येथील यात्रेकरूंच्या बसला अपघात झाल्याची अत्यंत दुःखद घटना आज घडली; तर 25 जणांचा मृत्यू झाला आहे. आम्ही सर्व मदत प्रयत्न करत आहोत. डीएम आणि एसपी दोघेही घटनास्थळी पोहचसे असून, एचएमने एनडीआरएफ टीम पाठवली असल्याची माहिती उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी दिली आहे.
मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यातील २८ यात्रेकरूंना घेऊन निघालेली बस उत्तरकाशी जिल्ह्यातील डामटाजवळ दरीत कोसळली असून १५ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले , तर 6 जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आले . तसेच घटनास्थळी पोलिस आणि SDRF पोहचले असल्याची माहिती DGP अशोक कुमार यांनी दिली.
दरम्यान उत्तराखंडमधील या भीषण बस अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत पंतप्रधान मोदींनी जाहीर केली आहे.
Web Title: Bus Fell Into Deep Gorge In Uttarkashi 22 Pilgrims Died Devotee From Madhya Pradesh
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..