२०२१ मध्ये अंबानींपेक्षा अदानी आणि प्रेमजींच्या संपत्तीत भरघोस वाढ

गुंतवणूकदारांना दोन्ही कंपन्यांकडून फायदा
azim-premji
azim-premjisakal media

नवी दिल्ली : अदानी ग्रुपचे (Adani Group) मालक उद्योजक गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या संपत्तीत या वर्षी ३.१५ लाख कोटी रुपयांची वाढ (More than three lac crore property increases) झाली आहे. त्यांची एकूण संपत्ती ५.७२ लाख कोटी रुपये इतकी नोंदवण्यात आली. ब्लूमबर्गच्या अहवालात (Bloomberg report) ही माहिती देण्यात आली. दुसरीकडे अजीम प्रेमजी (Azim Premji) यांची संपत्ती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्यापेक्षा जास्त नोंदवली गेली आहे. (Businessman Azim Premji property is more than mukesh Ambani according to Bloomberg survey)

azim-premji
मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा, धारावीत एकाच दिवशी ३४ कोरोना रुग्ण

जगभरातील श्रीमंत उद्योगपतींच्या क्रमवारीत मुकशे अंबानी १२, तर गौतम अदानी १४ व्या क्रमांकावर आहेत. अंबानी यांच्या संपत्तीत वर्षभरात ९८,८००० कोटींची वाढ झाली. त्यांची एकूण संपत्ती ६.८१ लाख कोटी इतकी आहे. जगातील टॉप १० उद्योगपतींमध्ये भारतातील एकही उद्योगपती नाही. उद्योजक गौतम अदानी यांच्या सहा लिस्टेड कंपन्या आहेत. २०२१ मध्ये त्यांच्या कंपनीकडून गुंतवणूकदारांना चांगला फायदा झाला.

अदानी एंटरप्राईजेसच्या शेअरने २.४५ पट रिटर्न्स दिले आहेत. अदानी ट्रान्समिशनने २८८ आणि अदानी टोटल गॅसने ३५१ टक्के फायदा दिला, तर दुसरीकडे अजीम प्रेमजी यांच्या उद्योगाने वर्षभरात १.२० लाख कोटींची कमाई केली. त्यांची एकूण संपत्ती ३.१३ लाख कोटी नोंदवली गेली. अजीम प्रेमजी यांच्या शेअरने गुंतवणूकदारांना ८४ टक्के फायदा पोहोचवला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com